शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

दादांमुळेच माझी राजकीय कारकीर्द; खेडचे आमदार अजित पवारांच्या पाठीशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 21:56 IST

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले, मी सद्यस्थितीत अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे.

भानुदास पऱ्हाड

शेलपिंपळगाव : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी रविवारी (दि.२) दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान आपणही अजितदादांच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया खेडचे आमदार दिलीप मोहिते- पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.                आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले, मी सद्यस्थितीत अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे. माझी राजकीय कारकीर्द घडविण्यातही दादांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रवादीत येण्यापूर्वी मी शिवसेनेत होतो. ११९९ साली सेनेकडून आमदारकीची निवडणूक लढवली. मात्र दुर्दैवाने त्यात माझा पराभव झाला. त्यानंतर अजितदादांनी मला शिवसेनेतून राष्ट्रवादीत सामील करून घेतले. राष्ट्रवादी पक्षात समाविष्ट करून घेतल्यानंतर २००४ साली खेड - आळंदी विधानसभेची त्यांनी उमेदवारी दिली. या निवडणुकीत माझा विजय झाला. त्यामुळे अगदी पहिल्यापासून मी अजित पवार यांच्या विचारांचा आहे. दरम्यान खेड तालुक्यातील अनेक विकासकामे आमदारकीच्या काळात मंजूर करून ती मार्गी लावली. तालुक्यातील विकासकामे मंजूर करून देण्यात अजित पवारांचा मोलाचा वाटा आहे.          दरम्यान २००९ साली माझी उमेदवारी कापली गेली. त्यावेळी अजित पवारांनी मला फोन केला. तसेच ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कापलेली उमेदवारी अजितदादांनी मला मिळवून दिली. दादांचा विश्वास सार्थ ठरवत तालुक्यातील जनतेने मला दुसऱ्यांना आमदार केले. अजितदादा कायमच माझ्या सुख दुःखात सहभागी आहेत. त्यामुळे यापुढेही मी अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात माझ्या नावाचे ते विचार करतील असा ठाम विश्वास आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसKhedखेडPuneपुणे