शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

माझा '' दादा '' जे बोलतो ते खरे होते.. त्यामुळे माझा विजय निश्चित : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 13:35 IST

मोदी आले नाहीत यातच भाजपचा पराभव त्यांनी मान्य केला आहे.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क

बारामती :  बारामती लोकसभा मतदारसंघातील मताधिक्क्याबाबत माझा दादा जे बोलला तसेच होईल. माझा येथील विजय निश्चित आहे. माझा दादा जे बोलतो ते खरे होते,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. सुळे यांनी बारामती येथे आई प्रतिभा पवार, भाऊ रणजित पवार, शुभांगी पवार, देवयानी पवार यांच्यासह अन्य पवार कुटुंबियांसमवेत मतदान केले. तर इंदापूर येथे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील मतदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात सर्वात उत्कंठावर्धक लढत म्हणून ज्या लढतीकडे पाहिले जाते ती लढत म्हणजे बारामती मतदारसंघ..राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुप्रिया सुळे व भाजपाच्या कांचन कुल यांच्यात ही लढत होत आहे. या लढतीसाठी दोन्ही प्रमुख पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावत ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. मतदानानंतर सुळे म्हणाल्या,.मतदान करताना नेहमीच भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना हा अधिकार दिला आहे. मतदान करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा गड सुप्रिया सुळे हेत जिंकणार असल्याचे सांगत मोठ्या मताधिक्क्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ते म्हणाले, मोदी यांच्या जाहीर सभेचे भाजपने बारामती येथे आयोजन केले होते. मात्र, त्यांनी राजकीय हवेचा अंदाज घेतला. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील मोदींनी येथे पाऊण लाखांच्या उपस्थितीत सभा घेतली होती. मात्र, मी लाखांच्या मताधिक्क्याने निवडुन आलो. त्यामुळेच अंदाज ओळखून मोदी आले नसावेत. तसेच, मोदी आले नाहीत यातच भाजपचा पराभव त्यांनी मान्य केला आहे. मोदीसाहब नही आऐ, कुछ तो लगता है, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांत चुळबुळ सुरू झाली असल्याचा टोला पवार यांनी लगावला.  पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्रकारांशी बोलत होते. बारामती आमची आहे, आमचीच राहणार . गेली अनेक वर्ष बारामतीने सहकार्य केले आहे.सांगता सभेला झालेली गर्दी सर्व काही सांगुन गेली. बारामतीकर स्वाभिमानी असल्याचे पवार म्हणाले.भाजपचा गेल्या पाच वर्षात केलेल्या कामावर विश्वासच होता.तर अनेक मतदारसंघात त्यांनी उमेदवार का बदलले ,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडुन उमेदवार आयात करण्याची वेळ त्यांच्यावर का आली,असा सवाल देखील पवार यांनी केला. राज्यात आघाडीला चांगले यश मिळेल,असा दावा पवार यांनी  केला.———————————————...तर राजकारणातुन निवृत्ती घेईन.बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होणार हि काळ्या दगडावरील पांढरीरेघ आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपने जिंकल्यास राजकारणातुननिवृत्ती घेईन. मात्र,भाजपला जिंकता  न आल्यास त्यांनी निवृत्तीघ्यावी,असा आव्हान अजित पवार यांनी दिले आहे.

 

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक