शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल कंपनीचा डेटा चोरून 62 लाखांच्या 150 विमान तिकिटाची परस्पर विक्री...

By भाग्यश्री गिलडा | Updated: May 26, 2023 17:35 IST

पुण्यातील कोट्यावधी रुपयांचा ट्रॅव्हल व्यवसाय असलेल्या दोन नामांकित ट्रॅव्हल एजन्सीची आर्थिक फसवणूक

पुणे : खाजगी विमान कंपनीकडे असलेली प्रीपेड खात्यातील माहिती चोरून अज्ञात व्यक्तीने 62 लाखांची तब्बल 150 विमानतिकिटांची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोट्यावधी रुपयांचा ट्रॅव्हल व्यवसाय असलेल्या दोन नामांकित ट्रॅव्हल एजन्सीची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा आणि रास्ता पेठ परिसरात सदर ट्रॅव्हल कंपनीची कार्यालय आहेत. तीन वेगवेगळ्या खाजगी विमान कंपन्यांशी आर्थिक व्यवहार करण्यासाठी या ट्रॅव्हल एजन्सीने विमान कंपनीच्या खात्यात प्रीपेड खाते उघडले आहे. संबंधित खात्याचा वापर करून ट्रॅव्हल एजंट प्रवाशांची आगाऊ तिकिटे काढत असते. त्यासाठी ट्रॅव्हल कंपनीकडून काही रक्कम खाजगी विमान कंपन्यांना देऊन आधीच बुकिंग केलेली असते.

एप्रिल महिन्यात संबंधित विमान कंपनीकडे ट्रॅव्हल्स कंपन्यांची खाती यामधील माहिती अज्ञात व्यक्तीने चोरली. या माहितीचा वापर करून संबंधित व्यक्तीने देशांतर्गत विमानसेवेची 148 तिकिटे आणि दोन आंतरराष्ट्रीय प्रवासाची विमान तिकिटे अशी एकूण 150 तिकिटे ऑनलाईन काढून लोकांची फसवणूक केली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस ट्रॅव्हल कंपनी संबंधित खात्याचा आढावा घेत असताना, याबाबतची माहिती समोर आली. त्यामुळे ट्रॅव्हल कंपनीने अंतर्गत चौकशी केली असता, सदर तिकिटे कंपनीने बुकिंग न करता दुसऱ्याच अनोळखी व्यक्तीने बुकिंग केल्याचे लक्षात आले. यानंतर तात्काळ धाव घेत झालेल्या प्रकारची माहिती सायबर पोलिसांना दिली.  याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये वेगवेगळ्या इंटरनेटचा वापर करून तिकिटे बुकिंग करण्यात आल्याचे लक्षात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेairplaneविमानfraudधोकेबाजीPoliceपोलिसticketतिकिटMONEYपैसाpassengerप्रवासी