शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'ताई, आपली 'मळमळ' समजू शकतो, पण..', मोहोळांचा पलटवार, सुप्रिया सुळेंचे उत्तर काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 17:50 IST

ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहितीये

किरण शिंदे

पुणे : नरेंद्र मोदींनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसोबतच ७२ मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा पार पडला. पहिल्यांदाच निवडून आलेले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे देखील मंत्री झाले. अनेक वर्षानंतर पुणे शहराला मंत्रिपद मिळाल्याने महायुतीत आनंदाचे वातावरण होतं. मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोहोळ यांच्यावर मंत्रिपदावरून खोचक टीका केली. मंत्री पद मिळालं, चांगली गोष्ट आहे.  मात्र त्याचा फायदा कंत्राटदारांना न होता सामान्य लोकांना व्हावा असं त्या म्हणाल्या. आणि यावरूनच सुप्रिया सुळे आणि मोहोळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २५ वा वर्धापन दिवस. त्यानिमित्त सुप्रिया सुळे पक्ष कार्यालयात आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. पुण्याला मंत्रिपद मिळालं, चांगली गोष्ट आहे. मात्र या मंत्रिपदाचा उपयोग कंत्राटदारांना न होता पुणेकरांना व्हावा असे त्या म्हणाल्या. पत्र पहिल्यांदाच खासदार अन मंत्री झालेल्या मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिले. ताई आपली मळमळ समजू शकतो. सामान्य कार्यकर्त्याला मंत्रीपद मिळाले हे तुमच्यासारख्या तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना पचनी पडणार नाही.. तर पुण्याचे आणि महाराष्ट्रातील मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे, असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले. 

मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट जसेच्या तसे..

सुप्रियाताई,शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं. ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो. उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेmurlidhar moholमुरलीधर मोहोळPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका