खेड तालुक्यात भाच्याने केला मामीचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:25 IST2018-06-19T17:25:43+5:302018-06-19T17:25:43+5:30

राहते घर माझे आहे ते आत्ताच्या आत्ता खाली करा असे सांगून काठीने बेदाम मारहाण केल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

murdered of women by person at Khed | खेड तालुक्यात भाच्याने केला मामीचा खून 

खेड तालुक्यात भाच्याने केला मामीचा खून 

ठळक मुद्देखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

डेहणे:  खेड तालुक्यातील डेहणे मधील इंदिरानगर येथे कातकरी वस्तीत झालेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १८ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी भागाबाई नथु बोरकर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी मृत महिलेच्या भाचा सुरेश वाघमारे या भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आई मयत महिला गजाबाई विष्णू वाघ व वडील एकलहरे (ता.खेड) येथे कातकरी वस्तीवर राहत असून त्यांना शासनाने यापूर्वी घरकुल दिले आहे. आरोपी सुरेश लक्ष्मण वाघमारे हे घरकुल माझे आहे ते खाली करा या कारणास्तव कायम भांडण करत होता. याच कारणावरुन आरोपीने घरासमोर दंगा केला. तसेच गजाबाई व त्यांच्या पतीला वाघमारे याने मारहाण करण्यास सुरूवात केली. ही मारहाण सुरू असताना गजाबाई जीव वाचवण्यासाठी शेजारच्या डेहणे गावात पळुन आल्या. आरोपीने त्यांचा पाठलाग करत डेहणे येथील त्यांच्या मुलीच्या घरासमोर त्यांना काठीने डोक्यात मारहाण केली. यात गजाबाई (वय ६०) जबर जखमी झाल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास विभागीय अधिकारी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करत आहे.
 

Web Title: murdered of women by person at Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.