The murder of a woman by a lover, the mother-in-law was revealed | प्रियकराकडून महिलेचा खून, सासूच्या खुलाशानंतर प्रकार उघड

प्रियकराकडून महिलेचा खून, सासूच्या खुलाशानंतर प्रकार उघड

ठळक मुद्दे राधेश्याम शर्मा (वय ३६, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिसांत फिर्याद दिली आहे. राधा फोन उचलत नसल्याने त्यांनी आपल्या सासूला फोन केल्यावर ‘ती प्रेम माळीबरोबर असेल; त्याच्याशी संपर्क साधा,’ असे सांगितल्यावर त्यांनी विचारणा केली.

पुणे : मध्य वस्तीतील एका सोसायटीमधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा तिच्या प्रियकराने उशीने तोंड दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. राधा राधेश्याम शर्मा (वय ३०, रा. नाना पेठ) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी प्रेम माळी (रा. खडकी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांचे पती राधेश्याम शर्मा (वय ३६, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हे मूळचे राजस्थानचे आहे. नाना पेठेतील पिंपरी चौकातील एका सोसायटीत ते राहतात. राधेश्याम शर्मा यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. कामानिमित्त ते कोल्हापूरला गेले होते. शनिवारी सकाळपासून ते पत्नीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत होते; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. पुण्यातील कामगाराने घरी जाऊन पाहिले तर इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी गाडी होती. पण, घराला कुलूप असल्याचे सांगितले. त्यांनी पुण्यातील सर्व नातेवाइकांकडे संपर्क साधला; पण कोणाकडेही त्यांची पत्नी नव्हती.  त्यानंतर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास शर्मा घरी परतले. त्या वेळी घराचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती समर्थ पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा राधा मृतावस्थेत आढळून आल्या. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. शर्मा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. राधेश्याम शर्मा यांच्या फिर्यादीनुसार प्रेम माळी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शर्मा यांची सासू काही दिवसांपूर्वी अचानक त्यांच्याकडे आली होती, तेव्हा त्यांनी ‘कशासाठी आलात?’ अशी विचारणा केल्यावर त्यांनी ‘मी अचानक येऊ शकत नाही का?’ असा प्रतिप्रश्न विचारला. राधा फोन उचलत नसल्याने त्यांनी आपल्या सासूला फोन केल्यावर ‘ती प्रेम माळीबरोबर असेल; त्याच्याशी संपर्क साधा,’ असे सांगितल्यावर त्यांनी विचारणा केली. त्या वेळी सासूने त्यांना सांगितले, की रेश्मा हिचे पुण्यातील प्रेम माळी याच्याबरोबर प्रेमसंबंध आहे. ती प्रेमबरोबर पळून जाणार होती. 

तीन महिन्यांपूर्वी मी याच कामासाठी रेश्मा हिला समजावून सांगण्यास पुण्यात आले होते. त्यामुळे शर्मा यांना धक्का बसला. कारण प्रेम माळी याला ते चांगले ओळखत होते व तो शर्माप्रमाणेच व्यवसाय करतो. एक-दोन वेळा त्यांच्या घरीही आला होता. प्रेम माळी याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन बंद होता. पोलिसांनी राधा यांच्या फोनची तपासणी केल्यावर राधेश्याम शर्मा यांना पुणे रेल्वे स्टेशनवर सोडल्यानंतर राधा यांनी प्रेम माळी याला फोन केल्याचे आढळले. 

राधा या घरी पोहचल्यावर प्रेम माळीही घरी आला. त्यानंतर त्यांच्या वाद झाल्याने प्रेमने राधाच्या तोंडावर उशी दाबून तिचा खुन केला. त्यानंतर बाहेरुन कुलूप लावून तो पळून गेला असावा असे घरातील सर्व परिस्थिती पाहिल्यावर पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला.  पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक पी. आर. शिकलकर अधिक तपास करीत आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The murder of a woman by a lover, the mother-in-law was revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.