शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

जेजुरीत महिलेचा खून , पैशाच्या वादातून दिराचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 04:40 IST

साकुर्डे येथे पैशाच्या वादातून एका महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरून टाकल्याची घटना घडली. सुमनबाई नारायण गोरड (वय ४५, रा. पुनवर, ता. करमाळा, सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे.

जेजुरी : साकुर्डे येथे पैशाच्या वादातून एका महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरून टाकल्याची घटना घडली. सुमनबाई नारायण गोरड (वय ४५, रा. पुनवर, ता. करमाळा, सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा मुलगा आनंद नारायण गोरड याने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.आनंद हा त्याच्या आईसह पुनवर येथे राहात होता व त्याचे चुलत चुलते धुळा बाबा गोरड हे जेजुरी-सासवड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये रखवालदार म्हणून काम करीतहोते. ते साकुर्डे येथे त्यांच्यापत्नीसह भाड्याने खोली घेऊन राहात आहेत. आनंद हा पोलीस भरतीच्या अभ्यासाकरिता श्रीगोंदा येथे काही दिवसांकरिता राहण्यास गेला होता.दि. ११-९-२०१७ रोजी त्याची आई श्रीगोंदा येथे आली. तिने त्याला शैक्षणिक खर्चाकरिता दोन हजार रुपये दिले व ती गावाकडे निघून गेली.मात्र दोन दिवस होऊनही ती घरी न पोहोचल्याचे समजल्याने आनंद गावी गेला. तिचा तपास न लागल्याने श्रीगोंदा येथे त्याने पोलीस स्टेशनला आई हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्याने साकुर्डे येथे राहणारे चुलते धुळा गोरड यांना फोन करुन आईबाबत चौकशी केली असता त्यांनी दि.१२-०९-२०१७ तुझी आई माझ्या घरी आली होती.खंडोबाचे दर्शन घेऊन फलटणला नातेवाइकाकडे जाते असे सांगून निघून गेल्याची माहिती दिली. त्यानंतर धुळा गोरड याला श्रीगोंदा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली.सुमनबाई यांच्याबरोबर पैसे देणे-घेणेच्या कारणावरुन भांडणे झाली व १३ स्पटेंबर रोजी रात्री एक वाजता तिच्या डोक्यात दगड घालून व पाईपने मारहाण करुन तिचा खून करुन मृतदेह घराजवळ शेतात पुरल्याची माहिती दिली.आज (दि.२४) श्रीगोंदा व जेजुरी पोलिसांनी पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी, वैद्यकीय अधिकारी व पंचासमक्ष शेतात उत्खनन केले. या वेळी कुजलेल्या अवस्थेत सुमनबाई यांचा मृतदेह आढळला. अंगावरील कपड्यावरून त्यांचा मृतदेह नातेवाइकांनी ओळखला. याबाबत अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस