शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम विवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात पत्नीची हत्या; रात्रभर मृतदेहाजवळ बसून होता पती, मग केला असा बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:38 IST

पोलिसांनी वैभवला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवला. यानंतर वैभव पोपटासारखा बोलू लागला...

पुणे- देहू येथे क्षुल्लक कौटुंबिक वादातून एकाने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव लांबकाणे असे आरोपीचे नाव आहे. तो देहू येथील वडाचा मळा येथील रहिवासी आहे. वैभवने घराजवळच राहणाऱ्या पूजा पाटील हिच्यासोबत गेल्या तीन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता.

वैभव लांबकाणे याच्या घरच्यांचा त्यांच्या विवाहाला विरोध होता. विवाहानंतर वैभव आणि पूजा यांच्यात अनेक क्षुल्लक कारणांवरून भांडण व्हायची. छोट-छोट्या कारणांवरून वैभव पूजाला मानसिक आणि शारीरिक त्रासही देऊ लागला होता. वैभव आणि पूजा यांच्यात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास  जोरदार भांडण झाले होते. मध्यरात्री पूजा झोपेत असतानाच भांडणाचा बदला घेण्यासाठी वैभवने तिचा गळा आवळला. यानंतर जीव वाचविण्यासाठी पूजाने बराच प्रयत्न केला. मात्र, मृत्यू होईपर्यंत वैभवने तिचा गळा सोडला नाही.

पूजाच्या मृत्यूनंतर वैभव रात्रभर तिच्या मृतदेहा जवळच बसून होता. यानंतर सकाळ होताच त्याने मृत पूजाच्या नातलगांना फोन केला आणि पूजाच्या छातीत दुखत होते यामुळे तिचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला, असे सांगितले. या निरोपानंतर, पूजाचे नातलग तत्काळ पूजाच्या घरी दाखल झाले. तेव्हा बिछाण्यातच पूजाचा मृतदेह त्यांच्या निदर्शनास आला. यानंतर त्यांनी देहूरोड पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे शहानिशा केली असता संपूर्ण प्रकार संशयास्पद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वैभवला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवला. यानंतर वैभव पोपटासारखा बोलू लागला आणि कौटुंबिक वादातून आपण गळा आवळून पूजाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस