खेड तालुक्यात कौटुंबिक वादातून एकाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:00 IST2018-07-07T20:56:52+5:302018-07-07T21:00:06+5:30

सातकरस्थळ येथे ३० वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

murder reason of family dispute in Khed Taluka | खेड तालुक्यात कौटुंबिक वादातून एकाचा खून 

खेड तालुक्यात कौटुंबिक वादातून एकाचा खून 

खेड : सातकरस्थळ येथे ३० वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बबन नाथा मेंगळे (वय ३०, सध्या रा. सातकरस्थळ, मुळगाव- ठाकरवाडी चांदुस, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयताची बहीण संगीता रामदास पारधी (वय ४२, रा. खंडोबाचीवाडी, धानोरे) यांनी राजगुरूनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन नाथा मेंगळे याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नी मुक्ता बबन मेंगळे हिच्या सोबत वारंवार भांडणे होत होती. त्यातून मुक्ताचा भाऊ गोरख विठ्ठल शिंदे, त्याचे चुलत मेव्हणे सुखदेव बाबुराव शिंदे, लालू बाबुराव शिंदे (सर्व रा. ठाकरवस्ती जैदवाडी, ता. खेड) यांनी मयत बबन मेंगळे याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. शनिवारी बबन मेंगळे याचा मृतदेह सापडला असून त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा आहेत. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत. 

Web Title: murder reason of family dispute in Khed Taluka