शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील खळबळजनक घटना; निवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा आंबेगावात खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 10:50 IST

पोलिसांकडून पाच जणांना अटक...

पुणे : पार्किंगमधील गाडी काढण्यावरुन झालेल्या वादात चौघा जणांनी सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. नरेंद्र रघुनाथ खैरे (वय ३३, रा. आंबेगाव बु) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. युवराज जंबु कांबळे, ओंकार अशोक रिठे, वैभव पोपट अदाटे, मनोज दत्तात्रय सूर्यवंशी, विष्णु कचरुन कदम (रा. नर्‍हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटे ते २७ जून सकाळी १० वाजून ५ मिनिटे या दरम्यान आंबेगाव बु़ येथील साई विश्व सोसायटी, न्यू प्यासा बार समोरील पार्किंगच्या जागेत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन पार्किंगमधील गाडी काढण्याचे कारणावरुन नरेंद्र खैरे याच्या शरीराचे स्प्लीन (हा एक मुठीच्या आकाराचा अवयव आहे जो तुमच्या पोटाच्या वरच्या डाव्या बाजूला, तुमच्या पोटाच्या पुढे आणि तुमच्या डाव्या फास्यांच्या मागे असतो) या अत्यंत नाजूक अवयवावर वारंवार हाताने ठोसे मारुन अंतर्गत गंभीर दुखापत करुन त्याला जिवे ठार मारले. त्यानंतर तिघा जणांनी त्याला उचलून श्री साई मोटर्स येथे ठेवून दिले. चारही आरोपींनी नरेंद्र खैरे याच्या खिशातील पाकीट, मोबाईल, हेडफोन ई वस्तू चोरुन नेल्या.  

हा सर्व प्रकार विष्णु कदम याने समक्ष घडलेला पाहिला़ मात्र त्यांनी त्याची माहिती कोणालाही दिली नाही़ जर त्यांनी हे पोलिसांना कळविले असते तर जखमीला वेळेवर मदत मिळाली असती व त्यातून त्याचा कदाचित जीव वाचला असता़ खूनासारख्या गुन्ह्यात माहिती न देता, हेतू पुरस्पर कुचराई  म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

श्री साई मोटर्स येथे एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मंगळवारी सकाळी पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर त्यांना गुन्ह्याची सर्व माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे़  वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस