शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Pune: मित्राच्या मदतीने आईचा खून; १८ वर्षीय मुलीच्या कृत्याने पुणे शहरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 10:26 IST

पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून या तरुणीच्या मित्राला अटक केली आहे...

- किरण शिंदे

पुणे : १८ वर्षीय तरुणीने मित्राच्या मदतीने स्वतःच्या आईचाच डोक्यात हातोड्याचे घाव घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरीत हा संपूर्ण प्रकार घडला. खून केल्यानंतर आई घरातील मोरीत घसरून पडल्याचा बनावही या तरुणी केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात या तरुणीचं भिंग उघड पडलं. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून या तरुणीच्या मित्राला अटक केली आहे. 

मंगल संजय गोखले (वय ४५, राजश्री कॉलनी वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेची मुलगी योशिता संजय गोखले (वय १८) आणि तिचा मित्र यश मिलिंद शितोळे (वय १८, गणेश नगर वडगाव शेरी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. विनोद शाहू गाडे (वय ४२) यांनी याप्रकरणी तक्रार दिली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आई घरातील मोरीत पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याचा बनावशी त्याने रचला होता. मात्र तिच्या नातेवाईकांना याबाबत शंका आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि हा संपूर्ण कट उघडकीस आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता ही मंगल गोखले यांची मुलगी आहे. तिने मित्र यश शितोळे यांच्या मदतीने आईच्या बँक खात्यातून पैसे काढले होते. पैसे काढण्याचे आईला समजले तर ती रागावेल अशी भीती तिला वाटत होती. यातून तिने आईचा खून करण्याचा कट रचला. तिने मित्राला घरी बोलावले. घरातील हातोडा त्याला दिला आणि झोपलेल्या आईच्या डोक्यात हातोड्याची घाव घालून खून करण्यात आला. यश शितोळे डोक्यात हातोडा मारत असताना योशिताने आईचे तोंड स्कार्पने दाबले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस