शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील डेक्कन परिसरात लॉन्ड्री चालकाचा खून; मृतदेह फेकला नदीपात्रात

By विवेक भुसे | Updated: September 26, 2022 17:27 IST

नदीपात्रात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

पुणे : डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नदीपात्रात खून करून तरूणाचा मृतदेह टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गणेश सुरेश कदम (वय 35, रा. शनिवारपेठ, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. 

नदीपात्रात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत अवस्थेत पडलेल्या तरूणाच्या गळ्यावर धारदार हत्यारांनी वार करून त्याचा खून केल्याचे दिसून आले. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हा मृतदेह आढळला. त्याच्याकडील तपासणीत त्याचे नाव गणेश कदम असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अधिक माहीती काढली असता तो हा लॉन्ड्री चालक असून त्याची शनिवार पेठेत लाँड्री असल्याचे समोर आले आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याला फोन आल्यानंतर तो घराबाहेर पडला होता. परंतु त्याचा शोध घेऊनही तो त्याच्या घरच्यांना सापडला नाही. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका सर्व्हिस सेंटर चालकाने नदीपात्रात झेडब्रीज जवळच एक मृतदेह पडला असल्याची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या या निघृण खुनाच्या प्रकारामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गुन्ह्याचा पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

टॅग्स :mula muthaमुळा मुठाriverनदीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू