शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दिरासोबत मिळून पतीचा खून; खुनाचा पुरावा नष्ट करून आत्महत्येचा बनाव, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 14:55 IST

पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून पतीचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावल्याचे चौकशीत समोर आले

आळंदी : चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथे दिरासोबत मिळून पतीच्या डोक्यात हत्याराने मारून त्याची पत्नीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. खुनानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र हा बनाव उघड करत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला अटक केली आहे. रविवारी (दि. २८) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास चऱ्होली हद्दीतील थोरवेवस्ती येथे ही घटना घडली आहे.

हुजूर महंमुद सय्यद (वय ३२, रा. थोरवे वस्ती, चऱ्होली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. सय्यद यांची अठ्ठावीस वर्षीय पत्नी आणि फिरोज महंमुद सय्यद (वय ३८ रा. मासाला खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवे वस्ती, चऱ्होली येथे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याबाबत आळंदी पोलिसांना रविवारी रात्री माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हुजूर सय्यद यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता सय्यद यांचा मृत्यू झाला होता. सय्यद यांनी घरात भिंतीला धडक घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांना यात संशयास्पद वाटल्याने त्यांनी खुनाच्या अनुषंगाने चौकशी केली असता सय्यद यांना झालेली जखम, घटनास्थळावरील परिस्थिती, सय्यद यांची स्थिती आणि त्यांच्या मुलीने दिलेली माहिती ही सय्यद यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीशी सुसंगत नव्हती. तसेच पत्नीने घरातील रक्ताचे डाग साफ केले होते. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सय्यद यांची पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून त्यांचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावली असल्याचा संशय चौकशीत समोर आला आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी