शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा कापून खून; झोपेत वार करून नराधम पती फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 13:24 IST

पती मूळचा बिहारचा असून खासगी गाडीवर चालक म्हणून काम करतो

पुणे : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना पिसोळी येथील पद्मावती हाइट सोसायटीत मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता घडली. आरती रणजित ऊर्फ विकास झा (वय २६) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती रणजित ऊर्फ विकास झा (वय ३६) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरतीचे काका राजेश रामक्रियापाल झा (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, रणजित हा मूळचा बिहारचा असून खासगी गाडीवर चालक म्हणून काम करतो. त्याची पत्नी आरती ही एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती. त्यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झालेला आहे. अद्याप त्यांना मूलबाळ नाही. एक महिन्यांपूर्वीच ते येथे राहतात.

रणजित आणि आरती यांच्यात सोमवारी (दि. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास वाद झाला. रणजित हा आरतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या पत्नीने त्यांच्या घरी जाऊन वाद मिटविला होता. दरम्यान, रात्री झोपेत असतानाच रणजित याने आरतीच्या गळ्यावर चाकूने वार केले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पती रणजित ऊर्फ विकास हा फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले यांनी भेट दिली.

मावशीच्या दारात आरती बेशुद्ध पडली

झोपेत असतानाच आरतीचा गळा चिरून पती फरार झाला हाेता. आरती राहत असलेल्या इमारतीत तिची मावशी राहते. जखमी अवस्थेत पहाटे ती मदतीसाठी त्यांच्याकडे धावली. बेल वाजवून तिने मावशी आणि काकाला उठवले. पतीने गळ्यावर चाकूने वार केल्याचे सांगितले. मात्र कारण सांगण्यापूर्वीच ती दारात कोसळून बेशुद्ध झाली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारmarriageलग्नSocialसामाजिक