शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भरदिवसा सिमेंटची विट डोक्यात घालून दारू दुकानाच्या व्यवस्थापकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 18:34 IST

आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

धायरी: सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी दारू दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या इसमाच्या डोक्यात सिमेंटची विट घालून खून केल्याची घटना घडली आहे. दिनकर सूर्यभान कोटमाळे (वय :४०, रा. चरवड वस्ती, वडगाव पठार, पुणे) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास  सिंहगड रस्त्यावरील शरद हॉस्पिटलच्या मागे प्रयेजा सिटी रस्त्यालगत असणाऱ्या देशी दारूच्या दुकानात घडली. याप्रकरणी तौशिब रफिक शेख (वय: २४, मारुती मंदिरामागे, आनंदनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) याला सिंहगड रस्ता पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील शरद हॉस्पिटलच्या मागे रामदास घुले व अरुण घुले यांचे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात दिनकर कोटमाळे हे व्यवस्थापक म्हणून काम करीत असत. आज शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी तौशिब शेख हा दारू पिण्यासाठी दुकानात आला असता त्याचे व्यवस्थापक दिनकर कोटमाळे यांच्याशी वाद झाले. या वादातून आरोपीने तेथे असणारी सिमेंटची विट त्यांच्या डोक्यात घातली. तसेच गळा दाबला असल्याचीही प्राथमिक माहिती मिळत आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच सिंहगड रस्ता पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीस तत्काळ ताब्यात घेतले.  घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDhayariधायरी