शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून, बारमध्ये बिलावरून वाद, बाऊन्सरने हातोडीने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 09:00 IST

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

धायरी: बारमध्ये बिलावरून झालेल्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय:३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सिंहगड रस्ता परिसरातील वीर बाजी पासलकर (वडगाव) पुलाजवळील क्लासिक बारसमोर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पुलाजवळ असलेल्या क्लासिक बारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार गोट्या शेजवाळ व त्याचे मित्र दारू पिण्याकरिता बसले होते. दरम्यान रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिलावरून बारचालकात व गोट्या शेजवाळ यांच्यात वाद सुरू झाला. तो बार बाहेर जाऊ लागल्याने तेथील बाऊन्सरने त्याला हॉटेलबाहेर अडविले. त्यातून त्याचे बाऊन्सरबरोबर वाद सुरू झाले. यात वाद इतके टोकाला गेले की, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.  बार लगत असलेल्या टायर पंक्चर दुकानातील हातोडी आणून बाऊन्सरने त्याच्या डोक्यात मारले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राघवेंद्र क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव, समीर चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक सुरेश जायभाय, अक्षय चव्हाण आदींसह पोलिस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू