पेरणे फाटा येथे अल्पवयीन मुलीचा खुन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:12 IST2021-04-23T04:12:54+5:302021-04-23T04:12:54+5:30
सागर सारधर वानखेडे (वय २८, रा. पेरणे फाटा, मूळ रा. बुलढाणा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी ...

पेरणे फाटा येथे अल्पवयीन मुलीचा खुन
सागर सारधर वानखेडे (वय २८, रा. पेरणे फाटा, मूळ रा. बुलढाणा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेरणे फाटा येथे लक्ष्मी नगर (ता.हवेली) भागात आरोपी व मुलगी भाड्याने रूम करून राहात होते. सागर सारधर वानखेडे हा तूप बनविण्याच्या कारखान्यात काम करीत होता. त्याचदरम्याने त्याची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली व तिच्यावर प्रेमसंबंध झाल्यावर तो तिच्याबरोबर लिव्ह ईनमध्ये राहत होता. मात्र काही दिवसांनंतरच त्याचे त्या मुलीबरोबर तिच्या चारित्र्यावरून भांडणे व्हायला लागली. आज सकाळी त्याने गळा आवळून खून केला. स्वःता पोलीस स्टेशनवर येऊन गुन्ह्याची कबुली दिली.
त्याची ओळख कुठे, कशी झाली, किती वर्षापासून एकत्र रहात होते आदी तपास पोलीस करीत आहे.
पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर पुढील तपास करीत आहे.