प}ीचा खून करणा:यास जन्मठेप

By Admin | Updated: November 12, 2014 00:07 IST2014-11-12T00:07:00+5:302014-11-12T00:07:00+5:30

प}ीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणा:या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणो यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे,

Murder: death sentence | प}ीचा खून करणा:यास जन्मठेप

प}ीचा खून करणा:यास जन्मठेप

पुणो : प}ीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणा:या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणो यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तसेच 5 हजार रुपयाचा दंडही भरण्याचे आदेशात नमूद केले. पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विजय राधाजी भंडारे (43 रा. मुळीक वस्ती, रामवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत सिंधूबाई विजय भंडारे (38 रा. मुळीकवस्ती, रामवाडी) यांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली होती. 
आरोपी विजय भंडारे सेट्रिंगचे काम करत होता तर सिंधूबाई भंडारे या धुण्या-भांडय़ाची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होत्या. आरोपीला दारूचे व्यसन होते, तसेच तो प}ीच्या चारित्र्यावरही संशय घेत असायचा. घटनेच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर 2क्1क् रोजी सिंधूबाई आम्रपाली सोसायटी, आगाखान पॅलेस येथून धुण्या-भांडय़ाची कामे उरकून घरी आल्या. तेथून त्या जवळच असलेल्या रामवाडी येथील दुकानात किराणा भरण्यासाठी गेल्या होत्या. दुकानातून घरी आल्यावर पती दारू प्यालेल्या अवस्थेत घरातच होता. त्या वेळी विजयने सिंधूबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने दोघांमध्ये भांडणो सुरू झाली. काही वेळाने शांत झाल्यावर सिंधूबाई यांनी स्टोव्हवर चहा ठेवला.
विजयने पुन्हा भांडणो सुरू करून स्टोव्ह लाथेने उडवून लावत रॉकेलने भरलेली बाटली सिंधूबाई यांच्या अंगावर ओतून त्यांना पेटवून दिले. भाजलेल्या अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  सिंधूबाई यात 84 टक्के भाजल्या होत्या. त्यांनी मृत्यूपूर्व जबाब नोंदवला, त्यात पतीने पेटवून दिल्याचे सांगितले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
 
आरोपीवर सुरुवातीला खुनाचा प्रय} व नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी वकील एन. डी. पाटील धायगावे व संजीव कदम यांनी 7 साक्षीदार तपासतले. सिंधूबाई यांचा मृत्यूपूर्व नोंदविलेला जबाब व डॉक्टरांची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड सुनावला.

 

Web Title: Murder: death sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.