शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षाच्या मुलीचा बांध फुटला अन् खुनाचा गुन्हा उघडकीस आला; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 22:14 IST

नवर्‍याचा खून करून पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव

पुणे : बंद घरात पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठविला. डॉक्टरांनी गळफास घेतल्याने मृत्यु असे प्राथमिक कारण नमूद करुन व्हिसेरा राखून ठेवला. सर्वांनीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मानून अत्यंसंस्काराची तयारी केली. अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या १३ वर्षाच्या मुलीचा इतका वेळ राखून धरलेला बांध फुटला. ती ओक्शाबोक्शा रडु लागली. तेव्हा तिचे नातेवाईकांनी सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रडत ती म्हणाली, मम्मीने पप्पाला मारले, ही बाब खडक पोलिसांना समजली. पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तिने गुन्हा कबुल केला. चारित्र्याच्या संशयावरुन होणार्या वादातून पतीला मारल्याचे सांगितले.

दीपक बलवीर सोनार (वय ३६, रा. गुरुवार पेठ) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर त्याची पत्नी राधिका दीपक सोनार (वय ३४) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.

दीपक सोनार हे जुन्या वाड्यात रखवालदाराचे काम करत होते. ते गरुवार पेठेतील एका वाड्यात पत्नी व मुलीसह राहत होते. राधिका ही मध्यवस्तीतील एका कपड्याच्या दुकानात काम करते. दीपक याला दारूचे व्यसन आहे. त्यातूनच पत्नी कामावरून घरी रात्री उशिरा आल्यास संशय घेत असे. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. सोमवारी रात्री राधिका कामावरून आल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी तिने दीपकला लाकडी बॅटने मारहाण केली. त्यानंतर त्याचा जोरात गळा दाबला. त्यात दीपकचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून राधिकाने दीपकचा मृतदेह उचलून बाधरूमध्ये दोरीने लटकला. दोन दिवस ती बाहेर गेली. परत आल्यानंतर तिने पतीने गळफास घेतल्याचा गाजावाजा केला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. 

दरम्यान, ससून रुग्णालयातूनही शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळफास घेतल्याने मृत्यु असे नमूद केले गेले. त्यामुळे खडक पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली. राधिका हिने आपल्या १३ वर्षाच्या मुलीला दम देऊन गप्प राहण्यास सांगितले होते. त्यामुळे सोमवारपासून ही मुलगी गप्प गप्प होती. पोलिसांनी विचारणा केल्यावरही तिने वडिलांनी आत्महत्या केल्याचे सांगितले होते. त्यामुळे दीपक याने आत्महत्या केली असे सर्व जण समजून अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्यसंस्कार करत असताना मुलीचा बांध फुटला. ती रडायची थांबेना. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी चौकशी केली. त्यावर तिने मम्मीने पप्पाला मारले, असे सांगितले. ही बाब पोलिसांपर्यंत पोहचली. त्यानुसार पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक