शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

असुरक्षित रस्त्यांना पालिका, ठेकेदार जबाबदार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 12:37 IST

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे.

ठळक मुद्दे१ लाखापर्यंत दंड : केंद्र सरकारकडून मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती 

पुणे : केंद्र सरकारने सुरक्षित रस्त्यांसंदर्भात वेळोवेळी निश्चित केलेल्या सुरक्षा मानकांचे (सेफ्टी स्टँडर्ड्स) पालन न केल्यास संबंधित संस्था, ठेकेदार, उपठेकेदार, सल्लागार यांना जबाबदार धरले जाणार आहे. या मानांकानुसार  रस्त्यांची रचना, बांधणी व देखभाल-दुरुस्ती केली नसल्यास संबंधितांना एक लाखापर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे, अशास्त्रीय गतिरोधक, बांधणीतील विविध त्रुटी आदी कारणांमुळे वाहनचालकांचा प्रवास असुरक्षित होत असेल, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे. या कायद्यातील ६३ सुधारित तरतुदींची अंमलबजावणी दि. १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. सुधारित कायद्यातील कलम ८४ नुसार १९८८च्या कायद्यात ‘१९८ अ’ या उपकलमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार रस्त्याची रचना, बांधणी आणि देखभाल-दुरुस्तीतील त्रुटींबाबतची जबाबदारी निश्चित करून संबंधितांना एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. इंडियन रोड काँग्रेसकडून सुरक्षित रस्त्यांची मानके निश्चित केली जातात. त्यानुसार कोणत्याही रस्त्याची बांधणी तसेच रस्त्याची रचना व देखभाल-दुरुस्तीबाबतही नियमावली करण्यात आली आहे. रस्ते बांधणी करणारी संस्था किंवा प्राधिकरण, ठेकेदार, उपठेकेदार, सल्लागार यांनी या नियमावलीचा आधार घेणे आवश्यक आहे. त्यानुसार रस्त्यांची बांधणी व्हायला हवी; पण त्यामध्ये काही त्रुटी राहिल्यास किंवा त्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. हा दंड कायद्यातील कलम ‘१६४ ब’अंतर्गत निर्मिती केल्या जाणाºया ‘मोटार व्हेईकल अपघात फंड’मध्ये जमा होईल, असे कायद्यात नमूद करण्यात आले आहे.संबंधितांना दोषी धरताना न्यायालय रस्त्याचे स्वरूप व त्यावरून होणारी वाहतूक, त्यासाठीची मानके, रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे संबंधित यंत्रणेला माहिती होते का, संबंधित यंत्रणेने रस्त्याचा धोकादायक भाग दुरुस्त करू शकली असती का, रस्त्यावर पुरेसे इशारा देणारे फलक अशा असे काही मुद्दे विचारात घेईल, असे कायद्यात म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वीच्या कायद्यामध्ये रस्त्यांच्या स्थितीबाबत संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्याबाबत कोणतीही तरतूद नव्हती. नवीन तरतुदीमुळे यंत्रणेला दोषी धरणे शक्य होणार असल्याने तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे.....नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदी समाधानकारक आहेत; पण न्यायालयाकडून तपासल्या जाणाºया बाबींमुळे पळवाट निर्माण झाली आहे. रस्तादुरुस्तीबाबत संबंधित यंत्रणेला माहिती होते किंवा नाही, हा मुद्दा सोयीनुसार वापरला जाईल; पण पहिल्यांदाच जबाबदारी निश्चित करण्यासाठी पाऊल टाकल्याने यंत्रणेवर दबाव राहील. - संजय शितोळे, वाहतूक अभ्यासक.......राज्यातील काही शहरांतील रस्त्यांच्या स्थितीबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यासोबत रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्रे सादर केली होती; पण ती त्याच रस्त्यांची कशावरून, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यामुळे केवळ कायदा करून उपयोग नाही. न्यायालयाने रस्त्यांच्या पाहणी करण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन करायला हवी. या समितीमार्फत आलेल्या तक्रारींची शहानिशा केली जाईल; अन्यथा रस्त्यांवरील खड्डे किंवा इतर बाबींवर संबंधितांना दोषी धरणे अवघड होईल. - अ‍ॅड. असीम सरोदे, विधिज्ञ........नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतूद क्रमांक ८४ नुसार रस्त्याचे डिझाईन, रस्ता बनविणे आणि देखभाल यांत हलगर्जीपणा झाल्यामुळे अपघात होऊन मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास संबंधित अधिकारी तसेच कंत्राटदाराला एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. ही तरतूद नक्कीच एक नवा पायंडा पाडणारी आहे आणि त्यामुळे निकृष्ट कामे करणाऱ्यांना जरब बसेल, अशी आशा करू या. या तरतुदीतून पळवाटा काढण्याचा प्रयत्न नक्कीच होऊ शकतो; परंतु सर्व पळवाटा लवकरच बुजवल्या जाऊन रस्त्यांची कामे करणाऱ्यांना त्या कामातील कुचराईबद्दल जबाबदार धरण्याला सुरुवात होईल, असे वाटते.- हर्षद अभ्यंकर, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट.......

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकारAccidentअपघातPoliceपोलिस