शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची अग्निशमन यंत्रणा वार्‍यावर

By admin | Updated: June 9, 2014 23:37 IST

आगीच्या दूर्घटनेनंतर तब्बल तीन कोटी रूपये खर्चून महापालिकेच्या मुख्यभवनात उभारण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा वा-यावर पडण्याची शक्यता आहे.

पुणे : दोन वर्षापूर्वी मंत्रालयात लागलेल्या आगीच्या दूर्घटनेनंतर तब्बल तीन कोटी रूपये खर्चून महापालिकेच्या मुख्यभवनात उभारण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा वा-यावर पडण्याची शक्यता आहे. ही यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी अग्निशमन विभागाने घ्यावी यासाठी भवन विभागाने दलास पत्र पाठविले आहे. तर अग्निशमनदलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तसेच संपूर्ण शहराची जबाबदारीही दलाकडेच असल्याने भवन विभागानेच ते काम पहावे अशी भूमिका अग्निशमनदलाच्या अधिका-यांनी घेतली आहे. मागील आठवडयातच या यंत्रणेची अंतिम चाचणी झाली असून ही यंत्रणा वापरासाठी सज्ज आहे.मंत्रालयात लागलेल्या आगीच्या दूर्घटनेऩंतर सर्व शासकीय कार्यालयांनी अग्निशमन यंत्रणा तत्काळ उभारण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार, तब्बल तीन कोटी रूपये खर्चून महापालिका प्रशासनाने मुख्यभवनात अग्निशमन यंत्रणा उभारलेली आहे. त्याची अंतिम चाचणीही नुकतीच पार पडली असून ही यंत्रणा वापरण्यासाठी तयार आहे. मात्र, ही यंत्रणा वापरासाठी अद्याप कोणतेही मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ती भिंतीवर शोभेपुरतीच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही यंत्रणा भवन विभागाने उभारलेली आहे. त्यामुळे तीच्या देखभालाची जबाबदारीही भवन विभागाची आहे, तर शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असणा-या कर्मचा-यांना ती वापरण्याची माहिती आहे. त्यामुळे भवन विभागाने ही यंत्रणा या पुढे अग्निशमन विभागाने सांभाळावी असे पत्र दलास दिले आहे. मात्र, दलाकडून त्यास नकार दिला आहे. अग्निशमनदलावर संपूर्ण शहराची जबाबदारी आहे. तसेच आधीच दलाची यंत्रणा अपुरी आहे. त्यामुळे ही जबाबदारी भवन विभागानेच स्विकारावी अशी भूमिका अग्निशमनदलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी घेतली आहे. परिणामी ही वापरासाठी सज्ज असलेली यंत्रणा रामभरोसेच महापालिकेत उभी असून एखादी दूर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ही यंत्रणा उभारण्याआधी तीची अंमलबजावणी कोण करणार याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नाही. शासनाचा आदेश म्हणून गडबडीने ही यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. ही यंत्रणा वापरण्यासाठी महापालिकेच्या कर्मचा-यांना प्रशिक्षणही देण्यात येणार होते. मात्र, अद्यापही हे प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कोणतीही दूर्घटना घडल्यास काय करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.