शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

गणेशमुर्तीचे विसर्जन घरीच करण्याचे महापालिकेचे आवाहन; खरेदीही करावी ऑनलाईन पध्दतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 21:40 IST

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींकरिता करणार रसायनाचाही पुरवठा      

ठळक मुद्देगणेश मुर्ती विक्रेते स्टॉल, क्षेत्रिय कार्यालय येथे हे रसायन नागरिकांना विनामूल्य उपलब्ध राहणार

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन घरीच करावे़ असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. तसेच यावर्षी गणेश विसर्जनासाठी कुठेही तात्पुरत्या स्वरूपात हौद उभारणी अथवा गणेश विसर्जन घाटांवर गणेश मुर्तींच्या विसर्जनास परवानगी दिली जाणार नाही, असेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. दरम्यान,शहरामध्ये दरवर्षी साधारणत: ५ लाख घरगुती गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना होत असते. त्यामुळे या मुर्तीचे घरात विसर्जन करताना त्या मूर्ती पाण्यात विरखळण्याकरिता, पुणे महापालिकेच्यावतीने 'अमोनियम बायकार्बोनेट' हे रसायन नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे. गणेश मुर्ती विक्रेते स्टॉल, क्षेत्रिय कार्यालय येथे हे रसायन नागरिकांना विनामूल्य उपलब्ध राहणार आहे.  गणेश मुर्तींच्या विसर्जनाकरिता दरवर्षी लाखोंच्या संख्येने नागरिक बाहेर पडतात. पुणे शहरात साधारणत: घरगुती ५ लाख प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींची प्रतिष्ठापना होते़ या मुर्तींच्या विसर्जनाकरिता जरी एका मुर्तीबरोबर कुटुंंबातील चार सदस्य गृहित धरले तरी, शहरात वीस लाखाहून अधिक नागरिक विविध भागांमध्ये बाहेर पडतील़ या पार्श्वभूमीवर व कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन, यावर्षी महापालिकेने विसर्जन घाट आणि हौदाची व्यवस्था न करण्याचा निर्णय घेतला आहे.    कोरोनाच्या संकट काळात सामाजिक भान बाळगून पुणेकरांनी यंदा घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरातच करावे़ तसेच घरगुती गणेशमूर्तींची उंची २ फुटांपर्यंत मर्यादित असावी़ असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे़ याचबरोबर गणेशोत्सव विसर्जनाच्या दुसºया दिवशी निर्माल्य आणि मूर्ती अवशेष मनपाकडून घेऊन जाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले़     ------------------------------------ गणेशमुर्तीची खरेदी ऑनलाईन पध्दतीने करावी                शहरात यावर्षी गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मनपा रस्ता, पदपथावर परवानग्या दिल्या गेलेल्या नाहीत.तर गणेशमूर्ती विक्री परवानग्या केवळ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मनपा शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर दिली गेली आहे. अशावेळी नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी गणेशमुर्तींची खरेदी ऑनलाईन पध्दतीने करावी, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. 'गणेशमूतीर्ची विक्रीच्या परवानग्या मनपाच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देण्याचे नियोजन केले जात आहे. उत्सव कालावधीत रस्ता आणि पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अधिकृत परवानगी यावर्षी दिली जाणार नाही. याचबरोबर अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायास पूर्णपणे प्रतिबंध केला जाणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. ------------------

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जनMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस