शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

डोकेदुखी ठरणारी जलपर्णी हटविण्यासाठी स्वत:चेच मशीन घेण्याची पुणे महापालिकेची कार्यवाही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:42 AM

जलपर्णी काढण्याची डोकेदुखी दूर होणार

ठळक मुद्देनदी व तलावपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी मनुष्यबळ व आवश्यक यंत्र देण्याचा निर्णय आरोग्य विभाग घेणार मशीन; दरमहा होतो ४० लाख रूपयांचा खर्च 

नीलेश राऊतपुणे :शहरातील डास उत्पत्तीला कारणीभूत असलेली व महापालिकेकरिता नित्याची डोकेदुखी ठरलेली जलपर्णी हटविण्यासाठी, सुरत महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेने स्वत:चीच मशीन घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे कमीत कमी काळात व अल्प मनुष्यबळाद्वारे आता शहरातील नद्या व तलाव जलपर्णीमुक्त होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.महापालिकेच्या मोटार वाहन विभागाने भारतातच तयार होणाऱ्या या मशीन खरेदीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. हे मशीन बनविणाऱ्या संबंधित कंपनीचे तज्ज्ञ पुणे शहरातील नद्या व तलावांमधील जलपर्णीची पाहणी करण्यासाठी पुण्यात आले आहेत. या पाहणीमध्ये पुणे शहरातील नदीमध्ये सहजरीत्या चालू शकेल तथा जलपर्णीची खोलवर रुजलेली पाळेमुळेही काढू शकेल, अशा प्रकारच्या मशिनची रचना करून तिचा पुरवठा करण्यात येणार आहे. येत्या एप्रिलअखेर ही मशिन पालिकेच्या मोटार वाहन विभागाकडे येईल, यादृष्टीने ही कार्यवाही सुरू आहे. केरळमधील सरकारी संस्थांना, तसेच सुरत महापालिकेसह उत्तरेकडील शहरांमध्ये व परदेशातही ज्या कंपनीने जलपर्णी काढण्यासाठी मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत. केरळ येथील ‘केलाचंद्र प्रेसिशन इंजिनिअर्स’ या कंपनीच्या अभियंत्यांकडून ही पाहणी करण्यात येत असून, याबाबतचा अहवाल ते पुणे महापालिकेला एका आठवड्यात सादर करणार आहेत. पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीतील व खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील मुळा नदीतील अशा साधारणत: २२ किमी नदीप्रवाहाच्या अंतरामधील, तसेच नानासाहेब पेशवे तलाव, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज आणि पाषाण तलाव या ठिकणच्या सुमारे २२० एकर क्षेत्रांवरील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेला दरवर्षी वर्षातील आठ महिने काम करावे लागते. यामध्ये पालिकेचा आरोग्य विभाग, उद्यान विभाग, घनकचरा विभाग व सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोटार वाहन विभाग यांचे सुमारे तीनशे जणांचे मनुष्यबळ कामी लावावे लागते.............* जलपर्णीची डोकेदुखी होणार दूरपुणे महापालिका कार्यक्षेत्रातील नदी व तलावपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी मनुष्यबळ व आवश्यक यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय २० मे २०१९ मध्ये अतिरिक्त आयुक्त यांच्या उपस्थितीतील बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर जलपर्णी निविदांचा विषय गाजला व हा विषय बारगळला. मात्र आता पालिकाच स्वत:चे मशीन खरेदी करणार असल्याने, आरोग्य विभागाच्या कीटकप्रतिबंधक विभागाची जलपर्णी काढण्याची डोकेदुखी दूर होणार आहे. ...............................* आरोग्य विभाग घेणार मशीन; दरमहा होतो ४० लाख रूपयांचा खर्च महापालिकेकडून जलपर्णी हटविण्यासाठी  दिवस वगळता अन्य आठ महिने काम करावे लागते. यामुळे पालिकेचे दर महिन्याला मनुष्यबळ, स्थानिक नावाडी व गाडी खर्च यावर साधारणत: ४० लाखांहून अधिक रुपये खर्च होतात.पावसाळ्यानंतर नदी, तलावांमध्ये जलपर्णीची वाढ झपाट्याने होत असल्याने, डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी जलपर्णी काढणे हे शहराच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण बनते व पालिकेकडूनही जलपर्णी हटविण्यासाठी हे काम अग्रक्रमाने केले जाते. सद्य:स्थितीला आरोग्य विभागाकडून राजीव गांधी तलाव, पाषाण तलावातील, तसेच खडकवासला धरणापुढील भागात जलपर्णी काढण्याचे काम चालू असून, येथे ७० ते ७५ जणांचे मनुष्यबळ खर्ची पडत आहे. परंतु, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या कामात मनुष्यबळाच्या कामाच्या वेगाची तुलना करता, जलपर्णीचा वाढीचा वेग अधिक असल्याने किती जलपर्णी हटविली गे तरी ‘जैसे थे’च परिस्थिती येथे दिसून येत आहे..........................आरोग्य विभागाकडून अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन जलपर्णी हटविण्याचे काम केले जात होते. वास्तविक पाहता आरोग्य विभागाचे हे कामच नाही. डासाची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करणे, जनजागृती करणे, औषध फवारणी करणे ही आमची मूळ कामे आहेत. जलपर्णी हटविण्यासाठी आल्यावर आम्हाला आमची ही कामे अधिक प्रभावीपणे करता येतील. - डॉ़ संजीव वावरे, सहायक आरोग्याधिकारी, पुणे महापालिका.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका