PMC: वडगाव खुर्द ,धायरीतील अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हातोडा
By राजू हिंगे | Updated: January 9, 2024 20:11 IST2024-01-09T20:10:06+5:302024-01-09T20:11:10+5:30
४५ हजार चौ.फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली आहे....

PMC: वडगाव खुर्द ,धायरीतील अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हातोडा
पुणे : सिंहगड रोड परिसरातील वडगाव खुर्द मधील स. नं. २६, २७, ३१ या मिळकतीवर असणारे अनधिकृत मंगल कार्यालय असलेल्या कोद्रे फार्म आणि धायरी येथील स. नं. १०२ व १०५ पार्ट येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या व बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर कारवाई करण्यात येऊन त्या पाडण्यात आल्या. ४५ हजार चौ.फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिका गेल्या काही दिवसांपासून कारवाई करत आहे. पुणे महापालिका बांधकाम विभाग झोन क्र.२ च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. एक जॉ कटर, दोन जेसीबी, दोन ब्रेकर, दहा बिगारी इत्यादींच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या वेळी सिंहगड रोड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.