शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत सहा इमारतींवर महापालिकेचा हातोडा; धायरी येथील सव्वा लाख स्केअर फूट बांधकाम पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:27 IST

नागरिकांच्या विरोधाला न जुमानता केली कारवाई

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील अंबाईदरा भागातील सर्व्हे नंबर ३१ मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या सहा इमारतींवर महापालिकेच्या शहर बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनच्या वतीने कारवाई करत सव्वालाख स्केअर फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेच्या जॉ कटरच्या साहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आले. जेसीबी, अतिक्रमण पोलिस कर्मचारी, तसेच बिगारी सेवकांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.या अनधिकृत इमारतींवर गुरुवारी महापालिकेच्या वतीने कारवाईस सुरुवात केली. यावेळी सुरुवातीला स्थानिक नागरिक व जागा मालकांनी या कारवाईला विरोध केला. मात्र, या विरोधाला न जुमानता महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत शांतता राखत महापालिकेने ही कारवाई पूर्ण केली. पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट गावांचा विकास आराखडा अजून तयार व्हायचा आहे. हा विकास आराखडा तयार करत असताना अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा येत आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी, तसेच बांधकाम व्यावसायिकांनी कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते करतात ‘ब्लॅकमेल’; कारवाई नावापुरतीच ...

तुमचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाकडून अनेक स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते खंडणी मागतात. खंडणी न दिल्यास महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना पाठीशी घालून या बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBuilding Collapseइमारत दुर्घटनाMuncipal Corporationनगर पालिका