मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 08:45 AM2019-05-09T08:45:33+5:302019-05-09T08:49:52+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (9 मे) दोन तास बंद राहणार आहे. एक्स्प्रेस वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ बंद राहणार आहे.

mumbai pune expressway to remain closed for two hours today | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद

ठळक मुद्देमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (9 मे) दोन तास बंद राहणार आहे. एक्स्प्रेस वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ बंद राहणार आहे. गुरुवारी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (9 मे) दोन तास बंद राहणार आहे. एक्स्प्रेस वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ बंद राहणार आहे. गुरुवारी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.  मात्र मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी दोन तास मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद असणार आहे. त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व मालवाहतूक करणारी वाहने एक्स्प्रेस वेवरील किमी 85/100 या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे. हलकी चारचाकी व इतर वाहने किवळे पुलावरुन जुना मुंबई -पुणे महामार्गाने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. 

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर किमी 55/600 आणि 88 वर (मुंबई वाहिनी) वर हे काम करण्यात येणार आहे. वाहनचालकांना एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीची सध्यस्थिती समजावी यासाठी हे फलक लावण्यात येत आहेत. वाहनचालकांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, अशी आवाहन पोलीस अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी केले आहे. 



 

Web Title: mumbai pune expressway to remain closed for two hours today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.