हिवाळी अधिवेशनात नवा कायदा, सर्वसामान्यांना भरडणाऱ्या बँका कायद्याच्या कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 03:39 PM2019-10-11T15:39:06+5:302019-10-11T15:40:21+5:30

मुंबईतील भाजप कार्यालयासमोर उतरल्यानंतर लगेच बँकेच्या खातेदारांनी त्यांना घेराव घालून त्यांच्यासमोर

'Multistate Bank to act in winter session', nirmala sitaraman says | हिवाळी अधिवेशनात नवा कायदा, सर्वसामान्यांना भरडणाऱ्या बँका कायद्याच्या कचाट्यात

हिवाळी अधिवेशनात नवा कायदा, सर्वसामान्यांना भरडणाऱ्या बँका कायद्याच्या कचाट्यात

googlenewsNext

मुंबईतील भाजप कार्यालयासमोर अर्थमंत्र्यांना पीएमसी बँकेच्या खातेदारांनी घेराव घातल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून खातेदारांचे म्हणणे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपर्यंत पोहोचवल्याचं, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर, आज पुणे येथील दौऱ्यावेळीही सीतारामन यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. त्यावेळी, येत्या हिवाळी अधिवेशनात मल्टिस्टेट बँकेचा कायदा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मुंबईतील भाजप कार्यालयासमोर उतरल्यानंतर लगेच बँकेच्या खातेदारांनी त्यांना घेराव घालून त्यांच्यासमोर ‘न्याय द्या, न्याय द्या’, अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सीतारामन म्हणाल्या, पीएमसी बँकेचे खातेधारक आल्याचे समजल्यावर मी त्यांना भेटायला बोलवाले. काहीजण बँक लुटून गेले आणि आता लाखो ठेवीदार अडचणीत आहेत. पीएमसी ही बहुराज्यीय सहकारी बँक आहे. मी आरबीआयच्या गव्हर्नरशी संपर्क केला असून लवकरात लवकर पीएमसी बँकेची प्रक्रिया पूर्ण करायला सांगितल्याचं सितारमण यांनी सांगितल. तसेच, येत्या हिवाळी अधिवेशनात मल्टिस्टेट बँकेचा कायदा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. ज्यात सर्वसामान्य भरडले जातात, त्या बँकांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.   
अमेरिका आणि भारतामधील व्यापारसंबंध सुधारतील. व्यापार आणि आर्थिक निर्णयांविषयी अर्थमंत्रीच निर्णय घेतील. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची केमिस्ट्री उत्तम होती, हे सगळ्यांनी बघितलंय. आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची उत्तम किंमत देऊ इच्छितो. कांदे आणि लसूण टिकावेत म्हणून काही करता येईल का, यासाठी भामा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधन सुरू आहे. त्यामुळे सरकारला दोषी धरणे चुकीचे आहे, असेही सितारमण यांनी म्हटले. 

दरम्यान, लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्याने विरोधकांसह सोशल मीडियावरुनही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याचं स्पष्टीकरण माजी संरक्षणमंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिलंय. तसेच, ही श्रद्धा असून अंधश्रद्धा नसल्याचंही सितारमण यांनी म्हटलं.  
 

Web Title: 'Multistate Bank to act in winter session', nirmala sitaraman says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.