महामार्गालगतचे नियोजन एमएसआरडीसीकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 01:23 IST2016-02-16T01:23:23+5:302016-02-16T01:23:23+5:30
मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गालगतच्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला विशेष नियोजन प्राधिकरण नेमण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला

महामार्गालगतचे नियोजन एमएसआरडीसीकडे!
पुणे : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गालगतच्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला विशेष नियोजन प्राधिकरण नेमण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून त्यामुळे अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर गेल्या वर्षी अस्तित्वात आलेल्या पीएमआरडीएच्या (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) कार्यक्षेत्रावर अतिक्रमण होणार आहे़
मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या दोन्ही रस्त्यांंमधील क्षेत्र व या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अंदाजे २-२ किमी अंतरामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ७५ गावे, खालापूर तालुक्यातील ७५ गावे आणि पनवेल तालुक्यातील ५२ गावे आहेत़ या क्षेत्रासाठी एमएसआरडीसीला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव नगर रचना विभागाकडे गेल्या वर्षी देण्यात आला होता़ त्याअनुशंगाने नगर विकास विभागाने याच्याशी संबंधीत सर्व विभागांना या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपला अभिप्राय देण्यास व या प्रस्तावास मान्यता देण्याची नगर विकास विभागास विनंती करण्यात यावी, असे पत्र पाठविले होते़ त्यानुसार सर्व विभागाने असे पत्र नगर विकास विभागाकडे पाठविले आहे़
पीएमआरडीएचे काम नुकतेच सुरु झाले आहे़ या प्रस्तावामुळे पीएमआरडीए तसेच खालापूर तालुक्यातील नयना फेज १ व २ मधील काही गावांचे क्षेत्र प्राधिकरणा्च्या हद्दीमधून वगळून एमएसआरडीसीकडे हस्तांतरीत करावी लागणार आहे़ याबाबत सजग नागरीक मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले, की रस्ते बांधणी असे मुळ उद्दिष्ट ठेवून स्थापन झालेल्या एमएसआरडीसी ला अजून स्वत:ची कामे नीट करता येत नाही़ टोलमधील झोल सप्रमाण सिद्ध झाला आहे़ ते विकास आराखडा बांधकाम आराखड्यापर्यंत व पाणीपुरवठ्यापासून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनापर्यंत सर्व बाबी करु शकेल, यावर विश्वास बसणार नाही़