शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण 'आक्रमक', कर्मचाऱ्यांना मारहाण, कार्यालयांची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध घेणार 'कडक अ‍ॅक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 18:08 IST

आतापर्यंत मारहाण, कार्यालयांची तोडफोड प्रकरणी ५४ जणांना अटक

ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रामध्ये ८२ आरोपींविरुद्ध फौजदारी कारवाई

, मारहाण, कार्यालयांची तोडफोड; 54 जणांना अटक

पश्चिम महाराष्ट्रामध्ये 82 आरोपींविरुद्ध फौजदारी

पुणे : कोरोना काळात आर्थिक संकटांचा सामना करताना मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवत महावितरणने मोठा शॉक दिला होता. या वाढीव बिलांमुळे आधीच संतापाच उद्रेक उसळला आहे. मात्र याच दरम्यान थकीत बिलांच्या वसुलीसाठी महावितरणकडून राज्यात वीज कनेक्शन तोड मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण, शिवीगाळ तसेच कार्यालयांची तोडफोड करण्याचे ३० प्रकार घडले आहेत. या प्रकरणी एकूण ८२ आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ५४ आरोपींना अटक करण्यात आली. 

महावितरणने याविरुद्ध कठोर पवित्रा घेतला असून आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ फौजदारी तक्रारी दाखल करण्यात येत आहेत.मारहाण किंवा तोडफोडप्रकरणी पुणे जिल्ह्यात ७ प्रकरणांत १६ आरोपींविरुद्ध तर कोल्हापूर जिल्ह्यात ६ प्रकरणांत ३४, सांगली जिल्ह्यात ३ प्रकरणांत ५ सोलापूर जिल्ह्यात ७ प्रकरणांत १३ व सातारा जिल्ह्यात ७ प्रकरणांत १४ आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

थकीत वीजबिलांचा भरणा होत नसल्याने सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. थकबाकीचा भरणा करण्यासाठी चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीजग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीजबिलांची तक्रार किंवा शंका असल्यास त्याचे देखील निरसन करण्यात येत आहे. तरीही वीजबिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची नाईलाजाने कारवाई करण्यात येत आहे. ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे व शासकीय कामात अडथळा आणून अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण, शिविगाळ तसेच कार्यालयांची तोडफोड आदी प्रकार करू नयेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या विविध कलमांन्वये दोन ते 10 वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद देखील आहे.

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी