शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा शासनाविरोधात ‘एल्गार’ ;सोशल मिडियावर चालवणार मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 15:28 IST

राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद करून विभाग स्तरावर विविध पद भरतीच्या परीक्षा घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला असून शासनाच्या या निर्णयाविरोधात एमपीएससी स्टुडेंट्स राईटस् व एमपीएससी समन्वय समितीतर्फे येत्या २४ फेब्रुवारीपासून सोशल मिडियावर ‘हॅश टॅग मोहिम’ राबविली जाणार आहे.

ठळक मुद्देसोशल मिडियावर मोहिम: येत्या २ मार्चला लाक्षणिक उपोषणयेत्या २ मार्चला लाक्षणिक उपोषण

 पुणे: राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद करून विभाग स्तरावर विविध पद भरतीच्या परीक्षा घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला असून शासनाच्या या निर्णयाविरोधात एमपीएससी स्टुडेंट्स राईटस् व एमपीएससी समन्वय समितीतर्फे येत्या २४ फेब्रुवारीपासून सोशल मिडियावर ‘हॅश टॅग मोहिम’ राबविली जाणार आहे. तसेच येत्या २ मार्च रोजी पुण्यात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

महापरीक्षा पोर्टल बंद करून शासनाने विभाग स्तरावर भरती घेण्याचा निर्णय अध्यादेशाद्वारे जाहीर केला. मात्र, विभागस्तरावर ऑनलाईन परीक्षा घेऊन सुद्धा त्यात महापरीक्षा पोर्टलसारखाच गैरप्रकार होणार आहे.तसेच सध्या राज्यात ऑनलाईन परीक्षांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे एका पदाची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सुमारे एक महिना लागतो. तसेच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासही बराच वेळ जातो. त्यात ऑनलाईन परीक्षेमध्ये कोणतीही पारदर्शकता नाही. त्यामुळे शासनाने ऑनलाईन परीक्षा बंद करून सर्व परीक्षा या लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ऑफलाईन पध्दतीने घ्याव्यात,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी केली आहे.

 शासनाने एमपीएससीला अधिक सक्षम करून सर्व परीक्षा एमपीएससीकडूनच घ्याव्यात,अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. राज्य शासनाकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशातून महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात आले किंवा नाही. हे स्पष्टपणे समजत नसल्यामुळे सुरूवातीला विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.परंतु, शासनाने ऑनलाईन पध्दतीने व विभाग स्तरावर परीक्षा घेतल्या जातील,असे नुकतेच स्पष्ट केले.त्यामुळे विद्यार्थ्यांनी शासन निर्णयाविरोधात येत्या २ मार्च रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यंमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.त्यामुळे शासनाने सर्व परीक्षा एमपीएससीतर्फे ऑफलाईन पध्दतीनेच घ्याव्यात,अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

महेश बढे, एमपीएससी स्टुडेटस् राईटस्  :सर्व परीक्षा एमपीएससीतर्फे घेतल्या जाव्यात, या एकमुखी मागणीसाठी येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व विद्यार्थीट्विटर वरून #onlyMPSC ही मोहिम सुरू केली जाणार आहे. तसेच सर्व आमदार व खासदारांना याबाबत लेखी निवेदन देण्यात येणार आहे. त्यांनी अधिवेशनात या विषयावर लाक्षणिक प्रश्न उपस्थित करावा,अशी विनंती लोकप्रतिनिधींना केली जाणार आहे. सर्व परीक्षा एमपीएससीकडून घेण्याचे शासनाने येत्या १ मार्चपर्यंत जाहीर न केल्यास २ मार्च रोजी आंदोलन केले जाणार आहे.

  किरण निंभोरे,विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा :महापरीक्षा पोर्टल बंद करून शासनाने विभागस्तरावर परीक्षा घेण्याचे निश्चित केले.मात्र,त्यामुळे अधिक गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे.एमपीएससीकडून घेतल्या जाणा-या परीक्षेत अधिक पारदर्शकता आहे.त्यामुळे शासनाने सर्व परीक्षा एमपीएससीकडे द्याव्यात. 

  माधव कल्लाळे, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा : शासनाकडून ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणा-या परीक्षा अधिक वेळ चालतात.तसेच ऑनलाईन परीक्षेत पारदर्शकता नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.एमपीएससीकडून पारदर्शकपणे व जलद गतीने परीक्षा होतात.त्यामुळे सर्व परीक्षा एमपीएससीने घेणे गरजेचे आहे.  नागेश भालेराव, विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा : एमपीएससी एवढी पारदर्शकता कुठेही नाही.त्यामुळे सर्व परीक्षा एमपीएससीकडे द्याव्यात.महापरीक्षा पोर्टल बंद करून विभागवार परीक्षा घेवून भरती करण्याचा निर्णय योग्य नाही. ऑनलाईन परीक्षांना अधिक वेळ जातो.तर ऑफलाईन परीक्षा लवकर होतात.त्यामुळे शासनाने आपल्या पुनर्विचार करावा.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया