शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

MPSC exam : मुख्यमंत्र्यांचा तोंडी आदेश; अंमलबजावणी कधी होणार? एमपीएससीचे विद्यार्थ्यी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:25 IST

वयाेमर्यादा मोजताना १ एप्रिल २०२४ मोजण्यात यावी

पुणे : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ आणि अराजपत्रित गट ब आणि क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून मुख्य सचिवांना तोंडी आदेश देण्यात आले आहेत. परंतु अंमलबजावणी झाली नसल्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थ्यी संभ्रमात आहेत. त्यामुळे पत्रकार परिषद घेउन वयामध्ये शिथिल देण्याची मागणी करण्यात आली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी संयुक्त अराजपत्रित गट ब आणि गट क पूर्व परीक्षेची वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकातील गट ब पदासाठी जाहिरात ही जानेवारी 2024 मध्ये ठरलेले होती. परंतु आयोगाच्या काही तांत्रिक कारणामुळे ही जाहिरात एक वर्ष उशिरा प्रकाशित झाली आहे. त्यामुळे 2024 मध्ये वयोमर्यादा बसणारे लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी या वयामध्ये बसत नाहीत, त्यामुळे ही जाहिरात वेळीच दिलेल्या वेळापत्रकानुसार आली असती, तर सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नसते. पाच जानेवारी रोजी होणाऱ्या परिक्षेआधी वयोमर्यादामध्ये बदल करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित आहे.या विद्यार्थ्यांची संधी केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हिरावून घेतली जाणार आहे. त्यामुळे आपले अपूर्ण स्वप्न घेऊन पुन्हा घरी कसे जावे, असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे. आयोगातर्फे खुल्या प्रवर्गासाठी ३१, मागास प्रवर्गासाठी ३४ तर खेळाडूसाठी ३६ वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परंतु पीएसआय पदासाठी वय मोजताना १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मोजले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संधी हुकणार आहे. त्यामुळे वयोमर्यादा मोजताना १ एप्रिल, २०२४ मोजली जावी, असे विद्यार्थ्यांची मागणी आहे.

सरकार आमच्यासोबत खूप खेळ करत आहे. तरुणांचे भवितव्य त्यांच्या हातात आहे. ते फक्त आपलीच सोय पाहतात. कोरोनामुळे आम्ही बरेच काही गमावले आणि आताही नवीन जाहिरात प्रक्रिया आम्हाला अडचणीत घालत आहे. आम्ही काय गुन्हेगार आहोत का? सरकारने आमच्या या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावी.  -प्रवीण पाटील, विद्यार्थ्यी आमची समस्या लवकरच सोडवली पाहिजे. अनेक तरुणाचे भवितव्य यावर अवलंबून आहे. आम्ही सर्वजण एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकू शकतो. मला विश्वास आहे की शेवटी न्याय मिळेल. -भाऊसाहेब पाटणकर 

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीexamपरीक्षाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड