शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

अंबाजोगाई येथील रुद्रवार दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू; खासदार सुप्रिया सुळेंची केंद्राकडे ट्विटद्वारे 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 20:10 IST

या घटनेतील संपूर्ण सत्य समोर यावं..पण त्याआधी रुद्रवार दाम्पत्याच्या चार वर्षीय चिमुरडीला भारतात सुखरूप परत आणावे: खासदार सुप्रिया सुळे

ठळक मुद्देनोकरीनिमित्त न्यू जर्सीत वास्तव्य : चार वर्षीय मुलगी मात्र सुखरूप

पुणे : अंबाजोगाई येथील व्यावसायिक भारत रूद्रवार यांचा मुलगा बालाजी हा आपल्या कुटुंबासह नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत न्यू जर्सी येथे वास्तव्य होता. मात्र बुधवारी रात्री त्यांचा व पत्नीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आत्महत्या की खून अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे या प्रकरणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्रालय आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाचं लक्ष वेधले आहे. तसेच केंद्र सरकारने या घटनेेत लक्ष घालण्याची मागणी केली आहे. 

बालाजी रुद्रवार हे आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाले होते.स्थानिक वेळेनुसार बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला व त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले असता त्यांना घरात बालाजी व आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळले.भारतीय वेळेनुसार ८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता तेथील पोलिसांनी या घटनेबाबत भारत रूद्रवार यांना फोनवरून माहिती दिली.

खासदार सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, न्यू जर्सी मध्ये घडलेल्या बालाजी रुद्रवार आणि त्यांच्या पत्नीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणात भारतीय परराष्ट्र खात्याने लक्ष घालत त्याची सखोल चौकशी करावी. तसेच अमेरिकेत एकट्याच अवस्थेत अडकलेल्या रुद्रवार दाम्पत्याच्या चार वर्षीय चिमुकलीला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती व्यवस्था करावी. .... रूद्रवार कुटुंबाला मानसिक धक्काया घटनेमुळे रूद्रवार कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. मृत आरती या गर्भवती असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, रूद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. शवविच्छेदनानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला हे स्पष्ट होणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत या घटनेची सविस्तर माहिती मिळण्याची शक्यता आहे. या दुर्दैवी घटनेत चार वर्षीय चिमुकली विहा सुखरूप असून तिला शेजाऱ्यांकडे सोपविले आहे. .... 

या घटनेबाबत आमदार नमिता मुंदडा यांनी खासदार प्रीतम मुंडे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकारी अमेरिकेतील दूतावासाच्या संपर्कात आहेत. अमेरिकेत रात्रीची वेळ असल्याने माहिती मिळण्यास विलंब होत होता.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूAmericaअमेरिकाCentral Governmentकेंद्र सरकारSupriya Suleसुप्रिया सुळे