शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: 'नियोजन समिती'वर खासदार-आमदार केवळ सन्मानापुरते, अजित पवारांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 10:54 IST

पुणे : “कायद्यानुसार जिल्हा नियोजन समितीवर खासदार, आमदार हे केवळ निमंत्रित सदस्य आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर आणि मागच्या ...

पुणे : “कायद्यानुसार जिल्हा नियोजन समितीवर खासदार, आमदार हे केवळ निमंत्रित सदस्य आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर आणि मागच्या खुर्च्यांवर बसलेले शासन नियुक्त सदस्य हेच समितीचे प्रमुख आहेत. आपल्याकडे केवळ मानसन्मान म्हणून तुम्हाला महत्त्व देतो. त्यामुळे खासदार, आमदारांच्या वेळा लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांच्या वेळा ठरणार नाहीत,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी खासदार, आमदारांना सुनावले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (दि. १०) पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी “सध्या संसदीय अधिवेशन सुरू असताना, जिल्हा नियोजन समितीची बैठक लावली. यापुढे अधिवेशन व इतर गोष्टींचा विचार करून बैठकीची वेळ निश्चित करावी,” अशी मागणी बारणे यांनी केली. यावर पवारांनी उत्तर दिले. आपल्या जिल्ह्यात फक्त जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मानसन्मान म्हणून आमदार, खासदारांना महत्त्व दिले जाते. अन्य जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष व शासन नियुक्त सदस्यांचा हा अधिकार आहे.

‘पीएमआरडीए’त साडेचार लाख अनधिकृत बांधकामे

“गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने पीएमआरडीए हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. प्रशासकीय अधिकारी व बिल्डरांचे लागेबांधे असल्याने एक-दीड वर्षे बांधकाम पूर्ण होत असताना दुर्लक्ष केले जाते. लोक राहण्यास आल्यावर बांधकाम पाडण्याची कारवाई होते,” असा मुद्दा आमदार सुनील शेळके, दिलीप मोहिते, भीमराव तापकीर, अशोक पवार यांनी मांडला. “पीएमआरडीए हद्दीत चाडेचार लाखांपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे असून, धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल,” असे पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले. यावर पवार यांनी किमान ओढे-नाल्यांवर झालेली बांधकामे पाडण्यासाठी तातडीने धडक मोहीम घ्या, असा आदेश अजित पवार यांनी दिला.

...तर ठेकेदाराचे बिल थांबवा

“गेल्या अनेक वर्षांपासून सिंहगड रस्त्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराला वेळोवेळी सांगूनही काम वेळेत पूर्ण केले जात नाही,” अशी तक्रार भीमराव तापकीर यांनी केली. “काम पूर्ण होणार नसेल, तर संबंधित ठेकेदाराचे बिल थांबवा,” असा आदेश यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारzpजिल्हा परिषद