तरुणांनी जोपासली सिनेमाची चळवळ

By Admin | Published: July 6, 2015 04:15 AM2015-07-06T04:15:38+5:302015-07-06T04:15:38+5:30

सिनेमा कसा पाहावा? त्यामधील कॅमेरा, दिग्दर्शन, अभिनय, कपडेपट, रंगभूषा, नृत्य, कथा हे सगळं नीट समजून घेऊन त्याबद्दल चर्चा घडवून आणण्याचे काम चाकणचे तरुण करत आहेत.

The movement of the youth that the youth started | तरुणांनी जोपासली सिनेमाची चळवळ

तरुणांनी जोपासली सिनेमाची चळवळ

googlenewsNext

चाकण : सिनेमा कसा पाहावा? त्यामधील कॅमेरा, दिग्दर्शन, अभिनय, कपडेपट, रंगभूषा, नृत्य, कथा हे सगळं नीट समजून घेऊन त्याबद्दल चर्चा घडवून आणण्याचे काम, ‘भारत ज्ञान विज्ञान समुदायाचा ड्रामा फॉर सोशल चेंज,’ हा समूह गेली दोन वर्षे सातत्याने करत आहे .
चाकण परिसर म्हटलं की गुंठामंत्री आणि आयत्या मिळालेल्या पैशांवर मजा करणारी पोरं डोळ्यांसमोर येतात. याच परिसरात काही तरुण अशा प्रकारचा उपक्रम सातत्याने राबवत आहेत ही गोष्ट मोठी आहे. हे तरुण खेड तालुकाभर ही चळवळ नेऊ इच्छितात.
एरव्ही नोकरी करणे, व्यवसाय सांभाळणे, शिक्षण घेणे अशी सगळी कामे सांभाळून हे तरुण हे सगळं का करतात, हे विचारल्यावर त्यांचे उत्तर अवाक् करणारं होतं.
.ते म्हणाले, ‘पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी सर्व नाट्य आणि सिनेमा चळवळ केंद्रित झाली आहे. आमच्यासारख्या ग्रामीण मुलांना काही करायचं म्हटलं की रोज पुण्याला जाणं किंवा तिथं राहणं शक्य नाही. म्हणून या कलेचं विकेंद्रीकरण होणं महत्त्वाचं आहे. म्हणून सर्व बाजूंनी प्रशिक्षित होऊन; कलेबाबत ज्ञान संपादित करत कला क्षेत्रात चाकण हे नाव मोठं करणं आणि कला ही फक्त पुण्या-मुंबईवाल्यांकडे नाही तर आम्हा ग्रामीण तरुणांकडेही आहे, हे सिद्ध करणं आमचं काम आहे.’
खेड तालुक्याचे काम दीपक मांडेकर,निखिल कांबळे, राहुल जाधव, नारायण करपे, नामदेव पडदुने, प्रमोद पारधी, संभाजी थिटे, वैभव धाडगे, सागर निखाडे,सागर राऊत, स्वप्नील निखाडे,केतन वाघमोडे,पांडुरंग पोटवडे, अक्षय घारे, अक्षय पानसरे,शेखर हळदे, कुणाल पालीवाल,गणेश गावडे, आमिर खान, स्वप्निल पाटील, सुदर्शन गायकवाड, केशव बनकर, विजय काकडे, सागर मांडेकर, नामदेव जरे, गिरीश कड, नमिता शेवकरी, माधुरी कुरकुटे, विजया तोडकर,प्रियांका चौधरी, स्नेहल गाडेकर, दीपाली शेवकरी हे तरुण पाहत आहेत.

Web Title: The movement of the youth that the youth started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.