तारादुतांचे ‘सारथी’समोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:35+5:302020-12-08T04:11:35+5:30
सारथीतर्फे राबविल्या जाणा-या विविध उपक्रमांसाठी राज्यातील ४८० जणांची तारादूत म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच या तारादूतांना महिन्याला १८ ...

तारादुतांचे ‘सारथी’समोर आंदोलन
सारथीतर्फे राबविल्या जाणा-या विविध उपक्रमांसाठी राज्यातील ४८० जणांची तारादूत म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच या तारादूतांना महिन्याला १८ हजार रुपयांचे मानधन दिले जात होते. मात्र, प्रकल्प सुरू ठेवण्यात अडचणी येऊ लागल्या.परिणामी याविरोधात फेब्रुवारी महिन्यात सारथीसमोर बेमुदत उपोषण केले होते.त्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तारादूत प्रकल्प सुरू राहील, असे आश्वासन दिले होते.परंतु, सारथीच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी तारादूत प्रकल्पाला स्थगिती देऊन तारादूतांची सेवा संपुष्टात आल्याचे सांगितले.
सारथी संस्थेतर्फे राबविण्यात येणारा तारादूत प्रकल्प मार्च २०२० पासून बंद केला आहे. मात्र,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष दिल्यास आम्हाला न्याय मिळेल.तसेच शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केले असल्याचे तारादूतांनी सांगितले.