शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मास्क कारवाई करणार्‍या पोलिसाच्या अंगावरच घातली मोटारसायकल; दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 13:00 IST

शहरात पोलिसांकडून चौकाचौकात विनामास्क घालून फिरणार्‍यांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे.

ठळक मुद्देपोलीस विनामास्क कारवाई करीत असल्याने अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग

पुणे : मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटारसायकल घालून त्यांना जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

सौरभ लहु उमेर (वय २०, रा़ साईनगर, हिंगणे) आणि मयुर धनंजय चतुर (वय २६, रा़ हिंगणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई बालाजी बाबुराव पांढरे (वय २७) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

बालाजी पांढरे हे शिवाजीनगर वाहतूक शाखेत नेमणुकीला आहेत. शुक्रवारी ते वीर चाफेकर चौकात विनामास्क कारवाई करीत होते. त्यावेळी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सौरभ व मयुर हे मोटारसायकलवरुन तेथे आले. त्यांनी मास्क घातला नसल्याने त्यांना अडवून पांढरे यांनी पावती करण्यास सांगितले. तेव्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन गाडीने धक्का मारुन खाली पडले. त्यानंतर पांढरे यांच्या पायावरुन गाडी घालून दुखापत करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना पकडून अटक केली असून त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.शहरात पोलिसांकडून चौकाचौकात विनामास्क घालून फिरणार्‍यांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे. अगदी नाकावरुन थोडाजरी मास्क खाली आला असला तरी पोलीस विनामास्क कारवाई करीत असल्याने अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग पहायला मिळत आहेत.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्याtwo wheelerटू व्हीलर