शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

मातृ सुरक्षा दिन : प्रसूती काळात माता दगावण्याच्या प्रमाणात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 2:15 PM

प्रसूती कालावधीत मातांमध्ये वाढणारा उच्च रक्तदाब, रक्तस्त्राव, अँनिमिया या गोष्टी मातांच्या दगावण्याला कारणीभूत ठरत आहेत.

ठळक मुद्दे पुण्यामध्ये बहुतांश प्रसूती या महापालिका किंवा खासगी रूग्णालयातएप्रिल 2018 ते मार्च 2019 - महापालिका आणि खासगी रूग्णालयांमध्ये 60 हजार 150 प्रसूती मातांचे मृत्यू टाळण्यासाठी ' माता अन्वेषण मृत्यू समिती'  देखील काही वर्षांपूर्वी स्थापन

- नम्रता फडणीस पुणे :  प्रसूती म्हणजे एका नव्या जीवाला जन्म देणे. या काळात महिलांचा एकप्रकारे पुनर्जन्मच होतो असे म्हणतात. महापालिकेसह खासगी रूग्णालयांमध्ये प्रसूती मातांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असूनही, दरवर्षी माता दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेच्या हददीत 2018-2019 मध्ये 20 माता तर बाहेरगावहून रूग्णालयांमध्ये नोंद झालेल्या 94 अशाप्रकारे गतवर्षी 114 माता दगावल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. प्रसूती कालावधीत मातांमध्ये वाढणारा उच्च रक्तदाब, रक्तस्त्राव, अँनिमिया या गोष्टी मातांच्या दगावण्याला कारणीभूत ठरत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत महापालिका आणि खासगी रूग्णालयांमध्ये जवळपास 60 हजार 150 प्रसूती झाल्या. यंदाच्या वर्षी बाहेर गावाहून रूग्णालयांमध्ये नोंद झालेल्या 14 माता तर महापालिका हददीतील 5 अशा एकूण 19 माता दगावल्याची नोंद झाली आहे. माता दगावण्याच्या कारणांमध्ये जखमेत पू होणे (1), हदयाचा आजार (1), टीबी, स्वाईन फ्ल्यू, न्युमोनिया सारखे तत्सम आजार (3) यांचा समावेश आहे.तर नोंदच होऊ न शकलेल्या कारणांची संख्या 8 आहे. यासंदर्भात महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे ' लोकमत' शी बोलताना म्हणाल्या, प्रसूती काळात महिलांचा रक्तदाब मोठ्या प्रमाणावर वाढतो. काही महिलांना रक्तस्त्राव सुरू होतो. तर कुणाला अँनिमिया किंवा हदयाचा आजार असतो. काही मातांच्या प्रसूती काळातील गुंतागुतींच्या केसेस सोलापूर, नगर, कोल्हापूर सारख्या भागातून शहरातील रूग्णालयांमध्ये येतात. त्या मातांचे दगावण्याचे प्रमाण हे अधिक आहे. त्यातुलनेत महापालिका हद्दीमध्ये माता दगावण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.  पुण्यामध्ये बहुतांश प्रसूती या महापालिका किंवा खासगी रूग्णालयातच केल्या जातात. त्यामध्ये 8 ते 10 हजार प्रसूती या महापालिकेच्या रूग्णालयात होतात.  महापालिकेने मातांचे मृत्यू टाळण्यासाठी ' माता अन्वेषण मृत्यू समिती'  देखील काही वर्षांपूर्वी स्थापन केली आहे. दर महिन्याला महापालिका किंवा खासगी रूग्णालयात ज्या मातांचे मृत्यू होतील, त्याचे संपूर्ण रिपोर्टिंग समितीमार्फत केले जाते. प्रत्येक महिन्याला समितीची बैठक होते. प्रत्येक केसेसची शहानिशा केली जाते. तिनं नाव कुठं नोंदविल होतं? ती चेकअपला वेळच्या वेळी जात होती का? कुठल्या कारणानं माता दगावली?  ते कसं टाळता येईल याचं निरीक्षण समिती नोंदविते आणि त्या निरीक्षणावर समितीकडून रूग्णालयांना सूचना दिल्या जातात. त्यामध्ये एएनसी मध्ये रक्तदाब पाहायला गेला पाहिजे. मातेला गरज असेल तर रूग्णालयात दाखल केले पाहिजे. ज्या मातांची प्रसूतीची मुदत जवळ आली असूनही  डॉक्टरांना भेटायला येत नाहीत त्यांना फोन करून बोलवून घ्यावे. ज्या प्रसूतीमध्ये धोके अधिक आहेत. त्याकडे विशेष लक्ष द्यावे असे सूचित केले जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले.----------------------------------------------------------वर्ष                   प्रसूती काळात दगावणा-या            प्रसूती काळात दगावणा-या                             मातांची संख्या (बाहेरगावहून)         मातांची संख्या 2016-17                 49                                    192017-18                 62                                    182018-19                 94                                    202019-20                14                                     5    

 

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWomenमहिला