जागेच्या कागदपत्रांसाठी मुलाकडून आईचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 04:14 IST2017-12-09T04:14:05+5:302017-12-09T04:14:16+5:30

जागेची कागदपत्रे मिळविण्यासाठी मुलानेच ७० वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. एरंडवणा येथील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये पहाटे ३च्या सुमारास ही घटना घडली

 Mother's blood from the child for the documents of the land | जागेच्या कागदपत्रांसाठी मुलाकडून आईचा खून

जागेच्या कागदपत्रांसाठी मुलाकडून आईचा खून

पुणे : जागेची कागदपत्रे मिळविण्यासाठी मुलानेच ७० वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. एरंडवणा येथील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये पहाटे ३च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र तपासणीनंतर अलंकार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून मुलाला अटक करण्यात आली आहे.
अरुणा मनोहर सपकाळ असे खून झालेल्या महिलेचे, तर आनंद (४३) असे तिच्या नराधम मुलाचे नाव आहे. आईकडे जागेची कागदपत्रे देण्यासाठी त्याने तगादा लावला होता. त्यासाठी तो तिला मारहाण करायचा.
गुरुवारी पहाटे त्याने अरुणा यांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आनंद याने आई उठत नसल्याबद्दल पोलिसांना सांगितले आणि तिला रुग्णालयात दाखल केले.

Web Title:  Mother's blood from the child for the documents of the land

टॅग्स :Crimeगुन्हा