शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO | पोटच्या लेकरासाठी आई भिडली दरोडेखोरांशी; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 19:33 IST

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

इंदापूर : 'चोरट्यांनी मला मारले असते तर चालेल असते, मात्र माझ्या छोट्या मुलाला मारता कामा नये' याच हेतूने त्या आईने आपल्या छोट्या मुलाच्या रक्षणासाठी शस्त्रधारी चार दरोडेखोरांचा प्रतिकार केला. या दरोडेखोरांच्या मागे धाव घेत त्यांना पळवून लावले. ही घटना इंदापूर शहरात घडली आहे. विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर हायवेलगत असणाऱ्या काझी फर्निचरशेजारी सादिक शेख यांची जागा आहे. या जागेवरती उत्तर प्रदेशातील एक कुटुंब व काही लोक पुठ्ठ्याचा व्यवसाय करीत आहेत, या ठिकाणी त्यांनी छोटेसे पत्र्याचे शेड राहण्यासाठी उभारले आहेत. या ठिकाणी धर्मराज कश्यप आणि त्याची पत्नी नीलम कश्यप आपल्या छोट्या मुलासह राहत आहेत.

शुक्रवारीच्या (दि. 3) रात्री एक वाजण्याच्या सुमारास चार शस्त्रधारी चोर या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. चोरट्यांनी यावेळी कश्यप यांच्या पत्र्याच्या शेडचा समोरील पुठ्ठा काढून बाजूला टाकला व घरात शिरणार यावेळीही या घरातील महिलाही जागीच होती. ती आपल्या छोट्या मुलाला दुध पाजत होती. चोर घरात शिरत असल्याचे तिच्या लक्षात आले. ते आता आपल्या वरती व आपल्या मुलावर हल्ला करून चोर चोरी करतील या भीतीने त्या महिलेने मला काहीही झाले तरी चालेल पण माझ्या लहान मुलाला काही होता कामा नये, म्हणून तिने यावेळी चोरट्यांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली.

चोरट्यांनी पहिल्यांदा चाकूचा धाक दाखवत त्या महिलेवर हल्ला चढविला. आपल्या मुलावर व आपल्या कुटुंबावर आलेले संकट परतून लावण्याचा प्रयत्न या महिलेने केला. यावेळी या महिलेला चोर चाकूचा धाक दाखवत असतानाही तिने कसलीही भीती न बाळगता महिलेने या चोरांच्या अंगावरती धावून गेली. शस्त्रधारी चार चोरट्यांनी तिचा रुद्र अवतार पाहता घटनास्थळावरून लागलीच पळ काढला, यावेळी ही महिलादेखील चोरांच्या पाठीमागे धावली.

यावेळी तिच्या मागे तिचा पती ही त्या चोरट्यांना दिशेने पाठलाग करीत पुढे गेला. मात्र चोर अंधाराचा फायदा घेत तेथून पळून गेले. विशेष बाब म्हणजे ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यासंदर्भात पोलिस इंदापूर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून इंदापूर पोलिसांनी या महिलेचे कौतुक केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीIndapurइंदापूर