राग जावयाचा अन् त्रास सासूला; वादातून सासू आणि तिच्या मित्राचे फोटो केले मॉर्फ
By भाग्यश्री गिलडा | Updated: May 20, 2023 16:51 IST2023-05-20T16:46:24+5:302023-05-20T16:51:07+5:30
दोघांचे चेहरे वापरून नग्न फोटो तयार करून पत्नीच्या आत्याला पाठवले....

राग जावयाचा अन् त्रास सासूला; वादातून सासू आणि तिच्या मित्राचे फोटो केले मॉर्फ
पुणे : कौटुंबिक वादावरून पत्नीला अश्लील मेसेज पाठवत सासूचे आणि सासूच्या मित्राचे फोटो मॉर्फ करून पाठवल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून आरोपी राकेश येलकर (रा. रायगड) याने पत्नीच्या मोबाईलवर अश्लील संदेश पाठवला. त्यांनतर विदेशी मोबाईल क्रमांक वापरून येलकरने सासू आणि तिच्या मित्राचे फोटो एडिट करून मॉर्फ केले. दोघांचे चेहरे वापरून नग्न फोटो तयार करून पत्नीच्या आत्याला पाठवले.
याप्रकरणी येवलेकरच्या विरोधात स्त्री अत्याचार केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता विधानाच्या कायद्यानुसार आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी आयटी ऍक्टच्या कलमाअंतर्गत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दादा गायकवाड हे करत आहेत.