धुणे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 10:26 PM2023-08-25T22:26:48+5:302023-08-25T22:27:10+5:30

लाकडी येथील धक्कादायक घटना

mother -daughter falls into a well and dies while going to wash clothes | धुणे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहिरीत पडून मृत्यू

धुणे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहिरीत पडून मृत्यू

googlenewsNext

बारामती दि २६(प्रतिनिधी ) वालचंदनगर ता. २५ लाकडी (ता.इंदापूर) येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा   दीड वर्षाच्या मुलीसह पाण्यामध्ये बुडून  मृत्यू झाल्याची  दुर्देवी घटना शुक्रवारी (दि २६) घडली.

जयश्री अनिल वणवे (वय २२,) व आरुषी अनिल वणवे (वय -दीड वर्षे) ,अशी या माय लेकीची नावे आहेत. जयश्री या दोन महिन्यांच्या गर्भवती होत्या.  वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार  शुक्रवारी  दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जयश्री वणवे या कपडे धुण्यासाठी  मुलगी आरुषीला घेवून घराजवळच्या विहिरीजवळ गेल्या होत्या. या विहिरीतील पाण्यामध्ये बुडून दाेघींचा  मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या  घटनेमुळे लाकडी गावावर शोककळा पसरली आहे .घटना समजल्यानंतर  नागरिकांनी  रात्री उशीरापर्यंत गावात गर्दी केली. रात्री उशीरापर्यंत या घटनेची पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली नव्हती.  वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे,पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी थांबून होते.

Web Title: mother -daughter falls into a well and dies while going to wash clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.