पुणे : पुण्याच्या चंदननगर परिसरात आई आणि मुलाने मिळून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रदीप अडागळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री चंदनगर परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. प्रदीप अडागळे असे त्याचे नाव आहे. ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे या दोघांनी मिळून त्याचे डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार केले. अडागळे गंभीर अवस्थेत असताना त्याला ससून येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघेही आरोपींना चंदन नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अडागळे हा सतत ऋषीच्या बहिणीला त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. या कारणावरून दोघांनी त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.