शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

'वो लड़की बहोत नाजूक है, मुझको दे दो, मैं उसके साथ मजा लेता हूँ', नराधमाकडून मायलेकींचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 17:57 IST

मायलेकींचा पाठलाग करणा-या परप्रांतीय तरूणांस तिच्या पती व स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

लोणी काळभोर : सकाळी अल्पवयीन मुलीसह फिरावयास गेलेल्या महिलेस कोयत्याचा धाक दाखवून 'रुको रूको वो लडकी को मुझे दे दो उसके साथ मजा करना है', असे म्हणत पाठलाग करणा-या परप्रांतीय तरूणांस तिच्या पती व स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून दिलीप राजू थापा (वय २६ वर्षे, सध्या राहणार रामदरा रोड, अंबरनाथ मंदीराजवळ चढावर, ता. हवेली, मुळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला नेहमी सकाळी फिरण्यासाठी रामदरा रोडला आपल्या १३ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला घेऊन जात असते. नेहमीप्रमाणे शुक्रवार (६ एप्रिल) रोजी सकाळी ५-४५ वाजण्याच्या सुमारांस त्या दोघी घरातून रामदरा रोडने रामदरा मंदिराकडे वॉकिंसाठी जावून परतत होत्या. सकाळी ६-४५ वाजण्याच्या सुमारांस रामदरा रोडवरील कोळपेवस्ती नजीकच्या रेल्वे पुलावर आल्या. त्यावेळी त्यांच्या मागून थापा आला व दोघींना पाहून हिंदीमध्ये 'वो लड़की बहोत नाजूक है, मुझको दे दो, मैं उसके साथ मजा लेता हूँ' असे म्हणाला. हे ऐकून दोघी घाबरून भितीपोटी पळू लागल्या. त्याने त्याच्या कमरेला असलेला कोयता हातात घेवून 'रुको रूको वो लड़की को मुझे दे दो उसके साथ मजा करना है असे म्हणून पाठलाग करून लागला. काही अंतर गेल्यानंतर समोरून एक पिकअप येत होता. त्यासमोर जाऊन तो उभा राहिला. ही संधी साधून दोघी मायलेकींनी बाजूला असलेल्या घरात जावून आसरा घेतला. 

तेथून फिर्यादी महिलेने रामदरा मंदीराजवळ क्रिकेट खेळत असलेल्या पतीशी फोनवरून संपर्क साधून घडला प्रकार सांगितला. याचवेळी महिला घरातून तो माणूस कोठे जात आहे यावर लक्ष ठेवून होती. तो रामदरा मंदीराकडे जात असताना त्याचा मित्र त्यास गाडीवर बसवून तु असे का करतो, मार खाशील असे म्हणून मोठ्यने आवाज करुन त्यास जबरदस्तीने गाडीवर बसवून घेवून गेला. थोड्या वेळावे पती रेल्वे ब्रिज जवळ गाडीवर येत असताना दिसले. ते आल्यानंतर विचारपूस करून पत्नीस गाडीवरून रामदरा मंदीरापर्यंत गेले परंतु तो दिसला नाही. ऊस तोड सुरू असलेल्या ठिकाणी जावून चौकशी केली असता एकाने तो माणूस रामदरा रेल्वे पुलाचे खाली काम करतो व तेथेच राहण्यास आहे अशी माहिती दिली. दोघे परत रेल्वे पुलावर आले असता जो माणूस त्याला घेऊन गेला तो भेटला. त्याचेकडे केलेल्या चौकशीत थापा कोळपे वस्तीच्या दिशेने जात असल्याचे सांगितले. ते त्यास पाहत येत असताना तो  रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. त्यावेळी पतीने क्रिकेट खेळत असलेला भाऊ व मित्रांना बोलावले. १०० नंबरवर फोन केला संपर्क साधल्यानंतर थोड्याच वेळात लोणी काळभोर पोलीस तेथे आले व दिलीप थापा याला कोयत्यासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेवून गेले. महिलेने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMolestationविनयभंग