खडकीत अज्ञाताने पेटविल्या मोटारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 16:06 IST2018-04-11T16:06:47+5:302018-04-11T16:06:47+5:30

सोने-चांदीच्या दागिन्यांचे खडकीतील व्यापारी हितेश पारेख यांच्या बंगल्यासमोर उभ्या असणाऱ्या या मोटारींना अज्ञात व्यक्तींनी आग लावली.

motar cars destroyed by unknown persons at khadki | खडकीत अज्ञाताने पेटविल्या मोटारी 

खडकीत अज्ञाताने पेटविल्या मोटारी 

पिंपरी : खडकीत सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास तीन अज्ञातांनी बंगल्यासमोर उभ्या असलेल्या दोन गाडयांना आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत महागड्या मोटारीसह अन्य एक मोटार अशा दोन गाड्या भस्मसात झाल्या. ही घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यामध्ये तीन जण आग लावताना दिसत आहेत. या प्रकरणी हितेश पारेख (वय २९, रा.खडकी) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. 
सोने-चांदीच्या दागिन्यांचे खडकीतील व्यापारी हितेश पारेख यांच्या बंगल्यासमोर उभ्या असणाऱ्या या मोटारींना अज्ञात व्यक्तींनी आग लावली. दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच पारेख यांनी तातडीने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब मागविण्यात आले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचण्यापूर्वी दोन चारचाकी गाड्या आगीत भस्मसात झाल्या. पोलिसांनी पारेख यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन अज्ञात व्यक्ती आग लावताना दिसत आहे. 

Web Title: motar cars destroyed by unknown persons at khadki