शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या १० वर्षातील सर्वात उशिरा मॉन्सून पुण्यात दाखल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 13:44 IST

पुणे शहरात सोमवारी सकाळी काही वेळ अधून मधून पावसाच्या सरी आल्या़...

ठळक मुद्दे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुण्यात १.४ मिमी पावसाची नोंद झालीपुढील चार दिवस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी वगळता राज्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही

पुणे : पुणे शहरासह अलीबाग, माळेगाव, खंडावा, धिंडवाडा या परिसरात मॉन्सूनने सोमवारी आगमन केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले़. पुण्यात मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर केले असले तरी पाऊस मात्र दिसून येत नाही.रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते़ ढगांनी आकाशात गर्दी केली होती़. मात्र, पाऊस काही झाला नाही़. पुणे शहरात सोमवारी सकाळी काही वेळ अधून मधून पावसाच्या सरी आल्या़. सकाळी पावसाळी वातावरण दिसून येत होते़. मात्र, काही वेळात आकाशात जमलेल्या ढंगाची पांगापाग झाली़. पाठोपाठ आकाश निरभ्र होऊन मोठा पाऊस येण्याची आशा दूर गेली़. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुण्यात १.४ मिमी पावसाची नोंद झाली होती़. जून महिन्यात पुण्यात सरासरी १०३ मिमी पाऊस पडतो़. परंतु, आतापर्यंत केवळ ४२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पुढील चार दिवसात जोरदार पाऊस येण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी या पावसाळ्यात अजून पाणी साठ्यात वाढ होऊ शकेल इतका मोठा पाऊस झालेला नाही.पुढील चार दिवस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी वगळता राज्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही. सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़. 

यापूर्वी पुणे शहरात मॉन्सून दाखल २०१९        २४ जून२०१८        ९ जून२०१७        १२ जून२०१६        २० जून२०१५        १२ जून२०१४        १९ जून२०१३        ८ जून२०१२        १७ जून२०११        ४ जून

टॅग्स :PuneपुणेMonsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती