शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १० हजारपैकी बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंदच - आमदार सिद्धार्थ शिरोळे

By राजू इनामदार | Updated: March 18, 2025 15:53 IST

- मुख्यमंत्र्याचे धोरण तयार करण्याचे आश्वासन

पुणे : एखादा गुन्हा घडला तर अलीकडे पोलिस सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहून गुन्हेगाराचा माग काढतात. पण हे सीसीटिव्ही कॅमेरे बंदच असतील तर? शहरातील १० हजार सीसीटिव्ही कॅमेऱ्यांपैकी बहुतांश कॅमेरे बंदच असल्याकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभा अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तत्काळ दखल घेत सरकार येत्या महिनाभरात सीसीटिव्ही कॅमेरे विषयक धोरण तयार करेल असे आश्वासन विधानसभेतच दिले.पुणे शहरात १० हजारपेक्षा जास्त सीसीटिव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. प्रमुख चौकांमध्ये, रस्त्यांवर, वर्दळीच्या ठिकाणी अशा त्यांचा जागा आहेत. त्यापैकी ४ हजार पुणे शहर पोलिसांचे, २५०० पुणे महापालिकेचे, मेट्रो सिटीचे २५००, स्मार्ट सिटी चे ४५०, त्याशिवाय रेल्वे, एसटी अशा काही कार्यालयांचे आहेत. यातील काही वाहतूक नियंत्रणासाठी, काही गुन्हेगारीविषयक कामांसाठी तर काही प्रवाशांच्या गर्दीचे किंवा एकूणच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी म्हणून आहेत. यासाठी बराच खर्चही करण्यात आला. मोठ्या शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.मात्र या १० हजार पैकी बरेच कॅमेरे बंद किंवा नादुरूस्त अवस्थेत असल्याची बाब आमदार शिरोळे यांनी विधानसभेतील चर्चेदरन्यान सभागृहाच्या निदर्शनास आणली. याचे कारणही त्यांनी सांगितले. सीसीटिव्ही कॅमेरे बसवले जातात, मात्र त्याच्या देखभालदुरूस्तीची व्यवस्था केली जात नाही, किंवा त्यासाठी काही महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट केले जाते, ते ८ किंवा १२ महिन्यांचे असते. ते संपल्यानंतर त्याकडे लक्ष दिले जात नाही. दुरूस्ती कोणी करायचा या वादात ते तसेच पडून राहतात व कालांतराने नादुरूस्त होतात असे शिरोळे यांनी सांगितले. यासंदर्भात सरकारनेच काही धोरण तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिरोळे यांच्या या मागणीची त्वरीत दखल घेतली. चर्चेला उत्तर देताना त्यांनी या प्रश्नाचा उल्लेख केला व ही वस्तुस्थिती असल्याचे मान्य केले. सरकारच्याही ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळेच सीसीटिव्ही कॅमेरे कोणीही बसवले तरी त्यासंदर्भात एक समान धोरण तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार यावर काम करत असून येत्या महिनाभरातच हे धोरण तयार होईल व ते लागूही केले जाईल असे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcctvसीसीटीव्हीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस