शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पर्यावरणाला घातक थर्माकोल पत्रावळीचा सर्रास वापर; पळसाची पत्रावळी होतेय नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:00 IST

ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून, जाळून टाकल्या जातात. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

ठळक मुद्देपानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकोलच्या पत्रावळी व प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यावर भरझाडांच्या पानांपासून केलेलं पात्र रुची वाढवणारे, भूक वाढविणारे

भूगाव : विज्ञानाच्या प्रगतीसोबतच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकावर आली आहे. पर्यावरणाचे संतुलन न राखल्यास मानवाला त्याची भविष्यात प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून, जाळून टाकल्या जातात. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.गावात होणाऱ्या भोजनावळीतून भांडी हद्दपार होऊ लागली आहे. पानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकोलच्या पत्रावळी व प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यावर भर दिला जात आहे. हा सर्व कचरा मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर फेकला जातो. त्याचे विघटन होत नसल्याने हवेमार्फत हा हलका कचरा सर्वत्र पसरतो. तसेच या पत्रावळ्यांतील अन्न गाय, बैल, कुत्रे यांसारखे पाळीव जनावरे खाता खाता थर्माकोलचा अंशही त्यांच्या पोटात जातो. हे खाऊन जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. तसेच या पत्रावळी जाळल्याने निर्माण होणारा वायू सजिवांच्या जीवनाला घातक ठरतो.भारतात वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या चालत आलेले पळसाच्या पानांच्या पत्रावळी, द्रोण आणि केळीची पाने जेवणावळीमधून इतिहासजमा झाली आहेत. यांच्यावर उपजीविका करणारे हजारो कुटुंब या व्यवसायापासून कोसो दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून दिल्या जातात. पर्यावरणासाठी नुकसानकारक ठरणाºया कॅरीबॅगच्या बंदीच्या अंमलबजावणीचे आव्हान कायम असताना या पत्रावळींचे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजकांनी पत्रावळींची योग्य विल्हेवाट लावण्याची काळजी घेतली पाहिजे. 

पळसाची पत्रावळी रुची व भूक वाढवणारीझाडांच्या पानांपासून केलेलं पात्र रुची वाढवणारे, भूक वाढविणारे आहे. आपल्याकडे पळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार केल्या जातात. काही वेळा जेवण्याकरिता केळीच्या किंवा कर्दळीच्या पानांचाही वापर केला जातो. बंगालमध्येही हीच पद्धत रुढ आहे. आपण मात्र मागासलेली, जुनाट म्हणून या पत्रावळी हळूहळू बाद करत आणल्या आहेत. व्यावहारिकदृष्ट्या खर्चही कमी येतो आणि ती सवय निसर्गाच्या अधिक जवळ आणणारी आहे.

टॅग्स :environmentवातावरणPuneपुणे