शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

डासाचा चावा, काळाचा घाला, पुणे-मुंबईत सर्वाधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 01:58 IST

डासाच्या चाव्याने पाच वर्षांत राज्यातील ६६६ जणांचा बळी घेतला आहे. डेंगीमुळे ४१३ आणि मलेरियामुळे २५३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

- विशाल शिर्केपुणे - डासाच्या चाव्याने पाच वर्षांत राज्यातील ६६६ जणांचा बळी घेतला आहे. डेंगीमुळे ४१३ आणि मलेरियामुळे २५३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. राज्यात पुण्यात डेंगीच्या सर्वाधिक ६६ आणि मुंबईत मलेरियाच्या सर्वाधिक ८३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या कीटकशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.मलेरियाच्या तुलनेत डेंगीने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक अहे. दर वर्षी सरासरी ६ हजार रुग्णांना डेंगीची लागण होते. त्यातील ८२ रुग्णांचा दर वर्षी मृत्यू होतो. तर, मलेरियाची ४० ते ४२ हजार रुग्णांना लागण होते. त्यांपैकी सरासरी ५० रुग्णांचा दर वर्षीमृत्यू झाला आहे. राज्यात डेंगीचा प्रादुर्भाव पुणे, मुंबई, ठाणे,नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांत दिसून आहे.राज्यात २०१३ ते २०१७ या कालावधीत डेंगीमुळे झालेल्या ४१३ मृत्यूपैकी २३८ मृत्यू याच ५ जिल्ह्यांतील आहेत. पुण्यामध्ये पाच वर्षांत ६६, मुंबई ५४, ठाणे ५१, नाशिक ३४ आणि नागपूरला ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, मे २०१८पर्यंत राज्यात डेंगी बाधितांची संख्या ५४३ असून, एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे.मलेरियाचा प्रादुर्भाव मुंबईत अधिक असून, तेथे सरासरी ८ ते १० हजार रुग्णांना मलेरियाची बाधा होते. त्यातील एकट्या मुंबईतच ८३ रुग्णांचा २०१३ ते २०१७ या कालावधीत मृत्यू झाला आहे. पाठोपाठ ठाणे ४८, गडचिरोली ४४, गोंदिया २१ आणि चंद्रपूरला १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मे २०१८ अखेर २ हजार ४५७ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.इंडियन मेडिकल असोसिएशन पुणेच्या अध्यक्ष डॉ. पद्मा अय्यर म्हणाल्या, की मलेरिया आणि डेंगी दोन्ही रोगांचा प्रसार डासांनी चावल्याने होतो. शहरात दररोज डेंगी बाधित रुग्ण आढळून येत आहेत.ताप आणि हाडे दुखण्याचा त्रास झाल्यास डेंगीचे लक्षण समजावे. मलेरियात प्रचंड डोकेदुखी, थकवा अणि जोराचा ताप येतो. यातील प्रकारानुसार आजाराची तीव्रता वाढते. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेऊन, त्याप्रमाणे औषधांचा डोस घेणे हा चांगला उपाय आहे. कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत: कोणतीही औषधे परस्पर घेऊ नयेत.मलेरियाचा रोगवाहक घटकप्ललाझामोडीयम प्रजातीच्या एकपेशीय सूक्ष्म परजीवी जंतूंचा संसर्ग झाल्याने हिवताप (मलेरिया) होतो. त्याचा प्रसार काही अ‍ॅनाफिलीस डासाच्या मादीमुळे होतो. भारतात आढळणाऱ्या अ‍ॅनाफिलीसच्या सुमारे ५८ जातींपैकी केवळ काहींच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो.ग्रामीण भागात अ‍ॅनॉफिलीस क्युलेसिफेसीस व शहरी भागात अ‍ॅनॉफिलीस स्टिफेन्सी हे डास रोगाचे वाहक आहेत. दूषित डास चावल्यानंतर त्वचेद्वारे, स्नायुद्वारे आणि शिरेद्वारे देण्यात येणारे रक्त अथवा प्लाझमाच्या अपघाताने मिलेरिया शकतो. मातेकडून नवजात अर्भकास जन्मजात मलेरिया होऊ शकतो.डेंगी आला वेस्ट इंडीजमधूनजगामध्ये डेंगीचा उद्रेक गेल्या तीन शतकांपासून शीतोष्ण, समशीतोष्ण व उष्ण कटिबंधात आढळून आलेला आहे. डेंगीचा पहिला उद्रेक इसवी सन १६३५मध्ये वेस्ट इंडीज येथे झाला. डेंगी ताप व एडिस इजिप्टाय डास प्रामुख्याने जगातील शीतोष्ण कटिबंधात पसरलेले आहेत.सध्या २५ दशलक्ष लोक डेंगी संवेदनशील भागात वास्तव्य करतात. डेंगी हा विषाणूपासून होणारा आजार असून, त्याचा प्रसार एडीस इजिप्टाय डासांमार्फत होतो. मागील दोन दशकांपासून डेंगी हा ताप, रक्तस्रावी ताप व शॉक सिंड्रोमचे रुग्ण संपूर्ण जगात आढळून येत असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे.अनियंत्रित लोकसंख्यावाढ, अनियोजित व अनियंत्रित शहरीकरण, कचºयाचे अयोग्य व्यवस्थापन, सदोष पाणीपुरवठा ही कारणे आहेत. डेंगीचा डास दिवसा चावणारा असून, त्याची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यांतील स्वच्छ पाण्यात होते.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूnewsबातम्या