शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
3
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
4
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
5
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
6
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
7
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
8
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
9
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
10
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
11
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
12
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
13
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
14
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
15
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
16
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
17
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
18
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
19
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
20
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!

रिंगरोडचे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन, लवकरच भूमिपूजन; गुरुवारी बैठकीत ठरणार मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:27 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आढावा बैठक गुरुवारी होणार

पुणे : रिंगरोडच्या पश्चिम भागाचे भूसंपादन ९६ टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून, भूमिपूजनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुरुवारी (दि. ९) आढावा बैठक होणार आहे. त्यात याबाबत निर्णय होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे लवकरच एका बाजूने काम सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डुडी म्हणाले, ‘जिल्ह्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यात शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा असलेला रिंगरोड प्रकल्पाचे पश्चिम भागातील भूसंपादन सुमारे ९६ टक्के झाले आहे. त्यामुळे ९० टक्के भूसंपादन असल्यास कामाला सुरुवात करण्यात येते.

तर पूर्व भागाचे ८२ टक्के भूसंपादन झाले असून, १८ टक्के संपादन बाकी आहे. त्यामुळे पश्चिमेच्या बाजूने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आढावा बैठक गुरुवारी होणार आहे. यात भूमिपूजन कधी करायचे, हे निश्चित होईल.पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत मंगळवारी बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) भूसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच प्रक्रिया एमआयडीसीकडून सुरू होणे अपेक्षित आहे. सप्टेंबरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून येत्या २०२९ पर्यंत विमानतळ पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने (एमएडीसी) अधिसूचना यापूर्वीच काढली आहे. मात्र, मध्यंतरी एमआयडीसीने भूसंपादन करण्याबाबतचे सरकारने परिपत्रक काढले आहे.

जिल्ह्यात १०० फायली ऑनलाइन करणार

सातारा जिल्ह्यात ई-ऑफिस १०० टक्के ऑनलाइन केले आहे. पुणे जिल्ह्यात ६० टक्के ई-ऑफिस झाले आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयांचा कारभार पूर्णपणे ‘ई-ऑफिस’च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य नागरिकांना तहसीलदार, प्रांत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये. प्रत्येक अर्जावर ठरवून दिलेल्या वेळेत कार्यवाही होईल, याकडे लक्ष पुरविले जाईल. तसेच त्यांचे काम सहजरीत्या लवकरात लवकर कसे करता येईल, हे पाहिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcommissionerआयुक्तEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMONEYपैसा