शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

क्रीडा क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या संधी अधिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 9:45 PM

क्रीडा विद्यापीठासाठी एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर

ठळक मुद्देशिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या क्रीडा विद्यापीठ आढावा बैठक

पुणे : क्रीडा क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्या वाढत्या संधी तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी क्रीडा विद्यापीठ अत्यंत गरजेचं असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे होणाऱ्या क्रीडा विद्यापीठासाठी जागा, सुविधांची पाहणी, तज्ज्ञांसोबत आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते.

पवार म्हणाले, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा व्यवस्थापन, पूरक उद्योग, क्रीडा प्रशिक्षण आणि तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी क्रीडा विद्यापीठ महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशिक्षण यांचे अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. क्रीडा विद्यापीठासाठी एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कोरोनामुळे त्यात काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने विद्यापीठाच्या कामाला गती दिली आहे. त्यामुळेच हे विद्यापीठाचे स्वप्न लवकरच साकार होईल, असेही ते म्हणाले.

क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले, विद्यापीठाची उभारणी करताना या क्षेत्रातील गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांसोबत विचारविनिमय करण्यात येत असून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे आवश्यक परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. क्रीडा विद्यापीठासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही केदार यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाची आवश्यकता, ध्येय, उद्देश या विषयांवरील सादरीकरण क्रीडा व युवक कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले.

कुलगुरुंबाबत मौन

क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोणत्या नावांची चर्चा झाली याबाबत उत्तर देण्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी टाळले. या बैठकीत विद्यापीठ शासक परिषद नियुक्ती, अनुदान आयोग मान्यता, विद्याशाखा, सुविधा, सल्लागार नियुक्ती, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे सहकार्य, आयआयटी मुंबई, आयआयएम अहमदाबाद यांच्याशी सहकार्य करार याबाबत चर्चा करण्यात आली. क्रीडा विद्यापीठासाठी जगभरातील अव्वल दहा विद्यापीठांचे सहकार्य घेतले जाणार आहे. 

जुन्या खेळाडूंना मिळणार संधीबीसीसीआयचा अध्यक्ष असताना आयपीएल स्पर्धा सुरू केली. त्यामुळे अनेक जुन्या खेळाडूंना संधी मिळाली. या विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक जुन्या खेळाडूंना विविध संधी मिळतील. उद्योग क्षेत्राच्या माध्यमातूनही खेळाडूंना नव्या संधी मिळू शकतील, त्यासाठी क्रीडा मंत्र्यांशी प्रयत्न करावेत, असेही पवार म्हणाले.

क्रीडा विद्यापीठ स्थापनेमागील मुख्य उद्देश क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे हा विद्यापीठ स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. क्रीडाविषयक नोकरीच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे, दर्जेदार प्रशिक्षक घडवणे, क्रीडा क्षेत्रात येण्यास तरुणांना व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे ही उद्दिष्टे आहेत. - सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारBalewadiबालेवाडीSunil Kedarसुनील केदार